दौंडमध्ये डंपरने शाळकरी विद्यार्थिनीला धडक दिल्याने ती गंभीर जखमी झाली.
अपघाताचा थरकाप उडवणारा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाला.
नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी विद्यार्थिनीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
ग्रामस्थांनी वाहतूक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
पुणे जिल्ह्यातील दौंडमध्ये भयंकर अपघाताची घटना समोर आली आहे. दौंड तालुक्यातील कुरकुंभमध्ये डंपरने शाळकरी विद्यार्थिनीला धडक दिली. या अपघातामध्ये विद्यार्थिनीचे थोडक्यात प्राण वाचले. ही विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. याचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याच्या दौंडतालुक्यातील कुरकुंभमध्ये भरधाव डंपरने शाळकरी विद्यार्थिनीला धडक दिली. कुरकुंभमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात ही घटना घडली. शाळकरी विद्यार्थिनीच्या दुचाकीला डंपरने पाठीमागून जोरदार धडक दिली. डंपरने धडक दिल्यानंतर ही विद्यार्थिनी थेट पुढच्या बाजूला दुचाकीसह रस्त्यावर पडली. या अपघातामध्ये विद्यार्थिनी बचावली पण ती गंभीर जखमी झाली.
Truck Accident: ट्रक चालकाचा निष्काळजीपणा, पार्किंग करताना हँडब्रेक लावायला विसरला; 3 वाहनांना धडक देत खड्ड्यात पडला, VIDEOही अपघाताचीघटना घडताच चौकातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. चालकाला डंपर पाठीमागे घ्यायला लावत जखमी विद्यार्थिनीला बाहेर काढण्यात आले. या घटनेत ही मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्या पायाचे हाड देखील मोडलं आहे. श्रावणी जाधव असं अपघातामध्ये जखमी झालेल्या मुलीचे नाव आहे.
Bus Accident: भीषण अपघात! भरधाव बसची टँकरला धडक, ५० फूट खोल दरीत बस पलटली, अनेकजण वाहनाखाली दबलेअपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी जखमी विद्यार्थिनीला नजीकच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अपघाताची ही थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. दरम्यान या घटनेनंतर नागरिकांनी वाहतूक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून ग्रामस्थांनी गर्दीच्या भागात अवजड वाहनांचा प्रवेश रोखावा अशी मागणी केली आहे.
Karishma Sharma Accident: धक्कादायक! धावत्या मुंबई लोकलमधून अभिनेत्रीने मारली उडी; कारण आलं समोर