इन्फोसिसने 10 कोटी शेअर्स परत विकत घेण्याचा निर्णय घेतला असून यासाठी तब्बल 18 हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत.
प्रति शेअर 1,800 रुपयांच्या दराने होणाऱ्या या बायबॅकमध्ये गुंतवणूकदारांना 19 टक्क्यांचा प्रीमियम मिळेल.
हा आयटी क्षेत्रातील सर्वात मोठा बायबॅक आहे.
Infosys Mega Buyback: आयटी कंपनी इन्फोसिसने मोठा निर्णय घेत गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले आहे. कंपनीने जाहीर केले की, ते 10 कोटी शेअर्स बायबॅक करणार आहेत. हे शेअर्स प्रति शेअर 1,800 रुपयांच्या दराने विकत घेतले जातील. या प्रक्रियेत कंपनी तब्बल 18 हजार कोटी रुपये खर्च करणार असून गुंतवणूकदारांना सुमारे 19 टक्के प्रीमियम मिळणार आहे. याचा अर्थ असा की गुंतवणूकदारांना सध्याच्या बाजारभावापेक्षा सुमारे 19 टक्के प्रीमियम मिळणार आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार हा बायबॅक पूर्णपणे रोखीने (cash) केला जाणार आहे. तसेच बायबॅकचे एकूण मूल्य हे कंपनीच्याएकूण पेड-अप कॅपिटल आणि फ्री रिझर्वच्या 25 टक्क्यांपेक्षा कमीच असेल. यासाठी 30 जून 2025 पर्यंतच्या नव्या आकडेवारीचा आधार घेण्यात आला आहे.
शेअर बायबॅक म्हणजे काय?जेव्हा एखादी कंपनी आपलेच शेअर्स बाजारातून परत विकत घेते, त्याला शेअर बायबॅक म्हणतात. यातून कंपनीच्या बाजारात उपलब्ध असलेल्या शेअर्सची संख्या कमी होते. हे सहसा तेव्हाच केले जाते जेव्हा कंपनीला वाटते की, तिच्या शेअर्सची किंमत बाजारात कमी आहे किंवा कंपनीकडे अतिरिक्त रोख रक्कम (cash) असते. बायबॅकमुळे प्रति शेअर कमाई (EPS) वाढते आणि त्यामुळे शेअरचे मूल्य वाढण्याची शक्यता जास्त असते.
Nepal’s Gen-Z Protest: नेपाळ मधील राजकीय आणि सामाजिक अस्थिरतेचा भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होणार?उदाहरणार्थ, जर इन्फोसिसकडे 100 कोटी शेअर्स असतील आणि त्यातील 10 कोटी शेअर्स परत विकत घेतले, तर उरलेले 90 कोटी शेअर्सवर कंपनीची कमाई विभागली जाईल. त्यामुळे पूर्वी 250 रुपयांचा असलेला शेअर बायबॅकनंतर वाढून जवळपास 277 रुपये होईल. यामुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढतो आणि बाजारात कंपनीच्या शेअरची किंमत वाढू शकते.
यापूर्वीही बायबॅक केलेइन्फोसिसनेयापूर्वी 2017, 2019 आणि 2021 मध्येही बायबॅक केले आहे. प्रत्येक वेळी कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सना नफा मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, यंदाचा बायबॅक आयटी क्षेत्रातील सर्वात मोठा बायबॅक मानला जात आहे. देशातील सर्वात मोठा बायबॅक अजूनही रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नावावर असला तरी, इन्फोसिसचा हा निर्णय आयटी सेक्टरसाठी ऐतिहासिक मानला जात आहे.
Larry Ellison: हवेली-रिसॉर्ट ते स्वत:च्या नावावर एक बेट; लॅरी एलिसन यांच्या जगभरातील प्रसिद्ध प्रॉपर्टीज कोणत्या? FAQsQ1. शेअर बायबॅक म्हणजे काय?
- जेव्हा एखादी कंपनी स्वतःचेच शेअर्स बाजारातून परत विकत घेते, त्याला शेअर बायबॅक म्हणतात.
- Share buyback means when a company repurchases its own shares from the market, reducing the total number of outstanding shares.
Q2. इन्फोसिस किती रकमेचा बायबॅक करणार आहे?
- इन्फोसिस 18,000 कोटी रुपयांचा बायबॅक करणार आहे.
- Infosys will conduct a share buyback worth ₹18,000 crore.
Q3. गुंतवणूकदारांना किती प्रीमियम मिळेल?
- गुंतवणूकदारांना या बायबॅकमध्ये सुमारे 19 टक्के प्रीमियम मिळणार आहे.
- Investors will receive nearly 19% premium through this buyback.
Q4. हा बायबॅक आयटी क्षेत्रासाठी का महत्वाचा आहे?
- कारण इन्फोसिसचा हा बायबॅक आयटी क्षेत्रातील सर्वात मोठा बायबॅक मानला जात आहे.
- Because this buyback by Infosys is considered the biggest in the Indian IT sector.