Stock Market Closing: शेअर बाजारात तेजी; निफ्टी 25,100च्या वर बंद, कोणत्या शेअर्समध्ये खरेदी?
esakal September 13, 2025 04:45 PM

Stock Market Closing Today: भारतीय शेअर बाजारासाठी हा आठवडा चांगला होता. संपूर्ण आठवड्यात बाजारामध्ये तेजी दिसून आली. आज, शुक्रवारी, सलग आठव्या दिवशी बाजार हिरव्या रंगात बंद झाला आणि यासोबतच निफ्टीनेही 25,100चा टप्पा ओलांडला. या आठवड्यातील वाढ पाहता, सेन्सेक्स सुमारे 1190 अंकांनी आणि निफ्टीने सुमारे 370 अंकांनी वाढला. आज दिवसभर वाढीसह व्यवहार केल्यानंतर, सेन्सेक्स 355 अंकांनी वाढून 81,904 वर बंद झाला. निफ्टी 108 अंकांनी वाढून 25,114 वर बंद झाला. बँक निफ्टी 139 अंकांनी वाढून 54,809 वर बंद झाला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.