विमान चालवताना पायलट झोपू शकतात का ? कसा करतात आराम ? सर्वेतून निर्माण झाले धक्कादायक प्रश्न
Tv9 Marathi September 13, 2025 04:45 PM

विमान उडवताना पायलट झोपू शकतात का ? जर्मनीच्या पायलटवर झालेल्या सर्वेने धक्का बसला आहे. या सर्वेत सामील सर्व जर्मन पायलटनी विमान चालवताना आपण थोडी डुलकी घेत असतो असे सांगितले आहे! उड्डाणांदरम्यान डुलकी घेणे ही आमच्या सदस्यांसाठी चिंतादायक वास्तव असल्याचे जर्मन पायलट युनियनने म्हटले आहे. वेरीनिगंग कॉकपिट युनियनचे म्हणणे आहे की त्यांनी अलिकडेच ९०० हून अधिक पायलटवर सर्वे केला. त्यात ९३ टक्के पायलट्सने गेल्या काही महिन्यात उड्डाणादरम्यान डुलकी काढल्याची कबुली दिली आहे.

या सर्वेने हा प्रश्न समोर आला आहे की पायलट विमान प्रवासादरम्यान झोपू शकतात का ? हा सर्वे आल्यानंतर पायलटवर कारवाई होऊ शकते की नाही ? लांबच्या प्रवासात ते कसा आराम करतात ? असे प्रश्न निर्माण झाले आहेत.

विमान प्रवासात झोप घेऊ शकतात की नाही ?

जगातील अनेक देश विमान प्रवासादरम्यान पायलटना झोप घेण्याची सुविधा देतात. पायलटना कॉकपिटमध्ये डुलकी काढण्याची परवानगी दिली जात असते. कॉकपिटला फ्लाईट डेक देखील म्हटले जाते. हा विमानाचा पुढचा भाग असतो जेथे पायलट आणि को-पायलट बसून विमान उडवतात आणि त्यास कंट्रोल करत असतात.

वाशिंग्टन पोस्टच्या बातमीनुसार अमेरिकेतील याबाबतचे नियम कठोर आहेत. नियमांनुसार अमेरिकेत पायलट असे करु शकत नाहीत. यास संपूर्णपणे बंदी आहे. अनेक देशात एअरलाईन्सने त्यांच्या पायलटसाठी झोपण्याची वेळ आणि जागा देखील निश्चित ठेवली आहे.यास कंट्रोल्ड रेस्ट म्हटले जाते.

काही देशात वैमानिकांना कंट्रोल्ड रेस्टची परवानगी असते

यास देखील नियम आहेत. पायलट विमान प्रवास करताना झोप घेणार की नाही हे यावर अवलंबून आहे की विमान किती दूरपर्यंत प्रवास करणार आहे. लांबच्या उड्डाणात सर्वसाधारणपणे अतिरिक्त पायलट असतात. म्हणजे जेव्हा दोन पायलट विमान उड्डाण करत असतात तेव्हा बाकीचे आराम करत असतात.

एअरलाईन आणि विमानाच्या आधारावर रेस्ट प्लेसची सुविधा दिली जाते. वॉशिंग्टन पोस्टच्या मते फेडरल उड्डयन प्रशासनाच्या (FAA) नियमानुसार पायलटच्या ड्यूटींचे तास मर्यादित केलेले असतात. उदा.लांबच्या उड्डाणावेळी त्यांनी किती आराम करायला हवा याची नियम आहेत.

कंट्रोल्ड रेस्ट म्हणजे काय ?

पायलटना विमान उड्डाण करताना झोपण्याची परवानगी नसते. परंतू काही अटींनुसार कंट्रोल्ड रेस्ट म्हणजे नियंत्रित झोपेची व्यवस्था असते. प्रत्येक मोठ्या कमर्शियल विमानात किमान दोन पायलट्स असतात. एक कॅप्टन आणि दुसरा फर्स्ट ऑफिसर. जर एक पायलट थोडावेळ कंट्रोल्ड रेस्ट घेत असेल तर दुसरा पायलट संपूर्णपणे अलर्ट असतो. ही वेळी २० ते ४० मिनिटांची असते. या दरम्यान एअर ट्रॅफीक कंट्रोलला देखील सूचना दिली जाते.

लांबच्या उड्डाणावेळी आरामाची व्यवस्था असते. इंटरनॅशनल रुट्सवर ३-४ पायलट देखील असू शकतात. यात काही जण शिफ्ट नुसार झोपतात. मोठ्या विमानात यासाठी खास रेस्ट कॅबिन देखील असते.

इंटरनॅशनल सिव्हील एव्हीएशन ऑर्गेनायजेशन (ICAO) च्या मते कॉकपिटमध्ये थकवा जाण्यासाठी झोपतात.यात कायम झोपेची जागा बनवू शकत नाही.

कशा प्रकारची असते झोप ?

विमान प्रवासादरम्यान पायलटंना खूप मोठी झोप घेण्याची परवानगी नसते. ते केवळ डुलकी काढू शकतात. ही काही मिनिटांची असते. वैमानिकाचा मूड त्यामुळे फ्रेश होतो. स्मृती वाढते. थकवा दूर करण्यास मदत होते. वाढलेले ब्लडप्रेशर देखील कमी होते.

१० ते ३० मिनिटांच्या डुलकीला शॉर्ट नॅप म्हटले जाते. यास उत्तम मानले जाते. त्यामुळे तन आणि मन दोन्ही ताजे आणि एनर्जेटिक बनते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.