Latest Marathi News Updates : नाशिकमध्ये सफाई कामगारांचा छळ
esakal September 13, 2025 11:45 PM
Nashik Live: नाशिकमध्ये सफाई कामगारांचा छळ

नाशिक महानगरपालिकेच्या सफाई कामगारांचा ठेका घेतलेल्या वॉटरग्रेस कंपनीच्या ठेकेदारांनी कामगारांवर अन्याय सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कामगारांच्या वेतनातून दर महिन्याला जवळपास ९,५०० रोख स्वरूपात वसूल केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. विरोध करणाऱ्या कामगारांना केवळ कामावरून काढून टाकण्यात आले नाही, तर शिवीगाळ व मानसिक छळही करण्यात आल्याचं उघड झालंय. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ठेकेदार पोलिसांच्या दप्तरी फरार आहे. छळाला कंटाळलेल्या कामगारांनी भाजप आमदार देवयानी फरांदे यांच्याकडे धाव घेतली असून, महिन्याकाठी जवळपास १ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार होत असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. सफाई कामगारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी न्याय द्यावा अशी मागणी केली आहे.

Nashik Live: नाशिकमध्ये कार चालकाची मुजोरी

नाशिकच्या इंदिरानगर बोगदा परिसरात एका कार चालकाने वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसवत उलट्या दिशेने गाडी चालवत एका महिलांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघातानंतरही जबाबदारी स्वीकारण्याऐवजी त्या कार चालकाने महिलेवरच दमदाटी केली. एवढ्यावरच न थांबता, हा चालक थेट वाहतूक पोलिसासमोरूनच फरार झाला. या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, वाहतूक पोलिसांच्या दक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Nashik Live: नाशिकमध्ये कार चालकाची धडक बसलेल्या महिलेलाच दमदाटी

नाशिकच्या इंदिरानगर बोगदा परिसरात कार चालक उलट्या दिशेने येत असताना त्याने महिलेच्या दुचाकीला धडक दिली. धडकेनंतरही त्याने महिलेलाच दमदाटी केली. मात्र वाहतूक पोलिसांसमोर कार चालक फरार झाला आहे.

Buldhana Live: 'किशोर कुमार' म्हणून नावाजलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेश राजगुरे यांचे निधन

बुलढाणा पोलिस दलातील गायक आणि 'किशोर कुमार' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हेड कॉन्स्टेबल राजेश राजगुरे यांचे आज पहाटे निधन झाले आहे. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. कोरोना काळात त्यांनी केलेल्या गायनामुळे त्यांना राज्य सरकारकडून सन्मानित करण्यात आले होते.

Mumbai Live: सोनसाखळी चोरीच्या प्रकरणातील इराणी आरोपीला अटक

मुंबईतील सोनसाखळी चोरीच्या प्रकरणातील इराणी आरोपी मोहम्मद अली फिरोज जाफरी उर्फ मोमो इराणी (वय २३) याला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई खेरवाडी पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने केसी आहे. आरोपीने वापरलेली रॉयल इनफिल्ड हंटर ३५० मोटारसायकल व वनप्लस मोबाईल असा एकूण १.७० लाख रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.

Nashik Live : शिक्षक भरती घोटाळाप्रकरणी अधिकाऱ्यांना न्यायालयीन कोठडी

नाशिकच्या मालेगाव मधील शिक्षण संस्थान मध्ये शिक्षक भरतीच्या घोटाळ्या प्रकरणी नाशिक जिल्हा परिषदेच्या 3 अधिकाऱ्यांना पोलीस कोठडी देण्यात आली होती आज त्यांना न्यायालयात हजर केले असता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे, या तिघा अधिकाऱ्यांना नाशिक आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली होती, यात आणखी काही आधीकरी अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे

Nashik Live : विंचूर उपबाजार आवारात कांद्याला कमी भाव, संतप्त शेतकऱ्यांचा रस्ता रोको आंदोलन

नाशिकच्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार आवर असलेल्या विंचूर येथे सकाळच्या सत्रात सव्वा तीनशे वाहनातून कांदा विक्रीसाठी आला होता सुरुवातीला गोल्टी व खादीच्या कांद्याचे लिलाव सुरू झाले यावेळी एका शेतकऱ्याच्या कांद्याला दोनशे रुपये प्रति क्विंटलला बाजार भाव पुकारून बीट रिव्हर्स करत शंभर रुपये केली यानंतर संतप्त झालेल्या शेतकऱ्यांमुळे दीडशे रुपये प्रति क्विंटल करण्यात आल्यानंतरही शेतकऱ्यांचा संताप अनावरण झाल्याने काही काळ नाशिक - छत्रपती संभाजी नगर राज्य मार्गावर शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन सुरू केले याची माहिती लासलगाव पोलिसांना मिळतात सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांनी शेतकऱ्यांची समजूत काढत संतप्त शेतकऱ्यांना बाजार समितीच्या आवारात नेत फेर लिलावाचा तोडगा काढून लिलावाला पूर्ववत सुरुवात करण्य आली

Kalyan Live : कल्याणमध्ये भाजप महिला आघाडीचे कांग्रेस विरोधात आंदोलन

कल्याणात भाजप महिला आघाडीकडून काँग्रेस विरोधात आंदोलन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, आणि त्यांच्या आईशी मिळता जुळत्या एआय व्हिडिओवरून नव्या वादाला तोंड फुटले आहे, बिहार कॉंग्रेसच्या अधिकृत पेजवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आली आहे, त्यानंतर भाजपाने काँग्रेसविरोधात आक्रमक पवित्रा घेत भाजप आमदार सुलभा गायकवाड, महिला जिल्हाध्यक्ष रेखा चौधरी, यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करीत निषेध नोंदवला आहे, कल्याण मध्ये भाजप महिला आघाडीच्या वतीने काटेमानवली नाका येथे काँग्रेसच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले, यावेळी महिला कार्यकर्त्यांनी हातात निषेधाचा फलक घेत माताजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्थान, शरम करो शरम करो काँग्रेस पार्टी शरम करो, महिला के सन्मान मे भाजप मैदान मे अशा जोरदार घोषणाबाजी केली व निषेध व्यक्त केला.

Gadchiroli live : चामोर्शी-मूल, आष्टी, घोट मार्ग दुरुस्तीसाठी तात्काळ निधी मंजूर करण्याची मागणी

गडचिरोली जिल्हातील प्रमुख शहर असलेल्या चामोर्शी तालुका हा सर्व बाजूने खड्डेमय झाला असून नागरिकांना प्रवास करताना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. त्यातच चामोर्शी- आष्टी, चामोर्शी-मूल, चामोर्शी - घोट मार्गावरील गंभीर खड्डयांमुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सुरजागड येथून दररोज शेकडो अवजड वाहने कच्चामाल घेऊन या मार्गावरून जात असल्याने रस्त्यावर मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. हा मार्ग गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्याला जोडणारा मुख्यमंत्री मार्ग असल्याने त्याची दुरुस्ती तात्काळ होणे गरजेचे आहे.

Latur LiveUpdate: लातूरच्या शालेय पोषण आहारासाठी आणलेल्या तांदळाला बुरशी आणि अळ्या

लातूरच्या सारोळा येथील जिल्हा परिषद शाळेत शालेय पोषण आहारासाठी मागविण्यात आलेल्या तांदळाच्या पोत्याला बुरशी आणि आळ्या आढळून आल्या आहेत, दरम्यान निकृष्ट दर्जाचा शालेय पोषण आहार आल्याने, शिक्षकांनी पोषण आहाराची गाडी परत केली आहे. मागच्या अनेक महिन्यांपासून नियमित चांगल्या दर्जाचा शालेय पोषण आहार मिळत नाही. त्यामुळे अशा निकृष्ट दर्जाच्या आहारामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाशी धोका निर्माण होऊ शकतो,

Tuljapur LiveUpdate: घस्थापनेआधी तुळजाभवानी देवीचे व्हीआयपी दर्शन महाग

यंदा २२ सप्टेंबरपासून नवरात्री सुरू होत आहे. याकाळात तुळजाभवानी मंदिरात भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळते. तसेच दर्शनासाठी व्हीआयपी दर्शन महाग होणार अशी माहिती मिळाली आहे.

Pandharpur LiveUpdate : पंढरपुरात मुसळधार पावसाची हजेरी, नागरिकांची मोठी तारांबळ उडाली

पंढरपुरात आज कृत्तिका नक्षत्राच्या सुरुवातीलाच मुसळधार पावसाने हजेरी लावली. सकाळी अर्धा तासाहून अधिक काळ धो धो पाऊस पंढरपूर शहरात कोसळला. त्यामुळे विठ्ठल मंदिर परिसरात आलेल्या भाविकांची मोठी तारांबळ उडाली. तर शहरातील नागरिकांचे मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेले दिसून आले.

Uddhav thackeray LiveUpdate: देशभक्तीचा व्यापार केला जातोय- उद्धव ठाकरे

देशभक्तीचा व्यापार केला जातोय असे पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाल आहे.

PM Modi LiveUpdate: पंतप्रधान मोदी मनिपुरमध्ये दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी मनिपुरला पोहोचले आहेत.

Nagpur Live : नागपूर जिल्ह्यातून दोन संशयितांना अटक , पाकिस्तानशी संबंधीत असल्याने एटीएसला शंका

- नागपूर जिल्ह्यातील कामठी परिसरातील दोन संशयितांना अटक

- पाकिस्तानशी संबंधीत असल्याने एटीएसला शंका

- महाराष्ट्र एटीएसच्या नागपूर पथकाची कारवाई

- पाकिस्तान व्यक्तीची फोनवर संपर्क झाल्याचा संशयावरुन दोघाना चौकशीसाठी घेतले ताब्यात..

- चौकशीसाठी एटीएसच्या चौकशीत काय माहिती पुढे येणार याकडे लक्ष..

Nandurbar Live : आरोग्य मंत्री प्रकाश आंबिटकर यांच्या सुरक्षेत मोठी चूक...

आदिवासी बांधवासाठी नर्मदा काठावर आरोग्य सेवा देणाऱ्या बोट रुग्णवाहिका पाहणी दरम्यान चूक... नर्मदा नदीवर विशाल पात्रावर तरंगणाऱ्या बोट रुग्णवाहिकेत एकही लाइफ जॅकेट नाही.... लाइफ जॅकेट विनाच आरोग्य मंत्रासोबत आमदार आमश्या पाडवी यांच्या जीव धोक्यात घालून प्रवास.... बोट ॲम्बुलन्स मध्ये लाइफ जॅकेट अनिवार्य असताना एकही लाइफ जॅकेट नसल्याचा धक्कादायक प्रकार...

Hingoli Rain News : हिंगोलीत परतीच्या पावसाने प्रचंड नुकसान, शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

हिंगोलीत परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. नद्यांना आलेल्या पुरामुळे शेती पाण्याखाली गेलीय. तर जनावरंही वाहून गेल्यानं शेतकऱ्यांना फटका बसला आहे. सरकारने नुकसानीची भरपाई द्यावी अशी मागणी करताना शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील आरळ ,तेलगाव शिवारात दीड हजार हेक्टर शेती 24 तासांपासून पाण्याखाली आहेत. तर गुंडा गावात दोन महिलांचा पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानं मृत्यू झालाय.

Tuljapur News Updates : नवरात्रोत्सवात तुळजाभवानी देवीच्या VIP दर्शन पासच्या किंमतीत वाढ

तुळजाभवानी देवीच्या व्हीआयपी दर्शनाच्या पासच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. २० सप्टेंबर पासून नवे दर लागू करण्यात येतील. यामुळे दोनशे रुपयांचा देणगी दर्शन पास आता तीनशे रुपयांना मिळणार आहे. तर पाचशे रुपयांच्या देणगी दर्शन पासची किंमत 1000 रुपये असणार आहे. स्पेशल गेस्ट रेफरल पासची किंमत ही दोनशे रुपयावरून वाढ होऊन पाचशे रुपये करण्यात आलीय. सकाळच्या अभिषेक पासची संख्या तीनशेवरून चारशे करण्यात आली असल्याची माहिती तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून देण्यात आलीय.

Raigad News Updates : महाडमध्ये नदीत ढकलून मित्राची केली हत्या

चार मित्रांमध्ये झालेल्या भांडणांत एका मित्राने आपल्या दुसऱ्या मित्राची पुलावरुन नदी पात्रात ढकलून हत्या केल्याची धक्कादायक घटना महाड तालुक्यातील शिवथर येथे घडली आहे. तुळशीराम गायकवाड असे मयताचे नाव असून तुषार येनपुरे याने तुळशीराम याची पुलावरून नदीच्या पाण्यात लकटून हत्या केली आणि सोबत असलेल्या मित्रांना जीवे ठार मारण्याचा दम भरल्याचे पोलिस तक्रारीत म्हटले आहे.

Nanded News Live Updates : नांदेडला पुराचा तडाखा, पुराच्या पाण्यात तरुणाची स्टंटबाजी

नांदेडमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे विष्णुपुरी प्रकल्पाचे पाच दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे गोदावरी नदीपात्राला मोठा पूर आला आहे. गोदावरी नदी पात्रावरील वाजेगाव येथील बंधारा संपूर्ण पाण्याखाली गेलेला असताना तीन तरुणांनी या पुराच्या पाण्यात स्टंटबाजी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. जीव धोक्यात घालून हे तिन्ही तरुण आजूबाजूला सर्वत्र पाणी असताना पुराच्या पाण्यात वावरताना पाहायला मिळत आहेत.

Dhangar Reservation : धनगरांना ST आरक्षण न दिल्यास वर्षा बंगल्यावर मेंढरं सोडू

धनगर आरक्षण एसटी आरक्षणाचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. या मागणीसाठी धनगर समाज बांधव आक्रमक झालेले आहेत. पुणे येथे सर्वपक्षीय सर्व संघटना धनगर समाजाच्या एकत्रित 15 सप्टेंबर 2025 रोजी पत्रकार भवन येथे निर्णायक बैठक घेणार आहेत. या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर मेंढरे सोडण्याचे काम येथील धनगर समाज बांधव करेल आणि यशवंत संघर्षनेचे संस्थापक अध्यक्ष यांनी फडणवीस सरकारला इशारा दिला आहे.

Amravati Live : अमरावतीत 16 रेशनची दुकाने रद्द, एक निलंबित

अमरावती जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने अमरावती जिल्ह्यात केलेल्या तपासणीत रेशनमध्ये तफावत आढळून आल्याने ५२ रेशन दुकानदार दोषी आढळून आले आहे. यातील १६ दुकाने रद्द करण्यात आली असून एक दुकान निलंबित करण्यात आले आहे. या दुकानदारांना २० लाख १४ हजार १६५ रुपयाचा दंड ठोठाविला आहे.

Kolhapur Live : कोल्हापुरात गुंडाचा निर्घृण खून; मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली घटना

कोल्हापुरात गुंडाचा निर्घृण खून

फुलेवाडी गंगाई लॉन येथे पाठलाग करत अज्ञातांकडून तरुणाचा खून

तर आणखी एकावर खुनाचा प्रयत्न

आज्ञाताने केलेल्या हल्ल्यात महेश राख याचा मृत्यू

तर विश्वजीत फाले हा गंभीर जखमी

हल्ल्यानंतर संशयित आरोपी फरार, संशयतांची नावे निष्पन्न झाले असून करवीर पोलीस ठाण्याकडून हल्लेखोरांचा तपास सुरू

हल्ल्यात मृत्यू झालेला आणि जखमी झालेले दोघेही सराईत गुन्हेगार

तर हल्ल्यात मृत्युमुखी पडलेला महेश राख हा नुकताच हद्दपारची शिक्षा भोगून शहरात दाखल झाला होता

शुक्रवारी हद्दपारची शिक्षा भोगून तो शहर परिसरात दाखल होताच मध्यरात्रीच चार ते पाच अज्ञात व्यक्तींनी केला खून

Maharashtra Live : ऑगस्ट महिन्याच्या देशी, विदेशी दारूच्याविक्रीत झाली घट

महाराष्ट्र शासनाने जुलै महिन्यात देशी आणि विदेशी दारूच्या दरात वाढ केल्याचा फटका ऑगस्ट महिन्याच्या विक्रीतून समोर आल आहे. वाशिम जिल्ह्यात विदेशी दारूच्या विक्रीत 16. 69 टक्क्यांनी घट झाली आहे. तर देशी दारूच्या विक्रीत मात्र चार 4 टक्क्याची घट झाल्याचं आकडेवारीतून समोर आला आहे. देशी, विदेशी दारूच्या विक्रीत घट झाली असताना दुसरीकडे मात्र बियरच्या विक्रीत मात्र 17 टक्क्यांनी वाढ झाल्याचं बघायला मिळालं.

Karul Ghat Road : नऊ दिवस बंद ठेवलेला करूळ घाटमार्ग आज दहाव्या दिवशी वाहतुकीस खुला

गगनबावडा : धोकादायक दरडी हटविण्यासाठी गेले नऊ दिवस बंद ठेवलेला करूळ घाटमार्ग आज (ता. १३) दहाव्या दिवशी वाहतुकीस खुला करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी महामार्ग प्रधिकरणाला तसे आदेश दिले आहेत.

Kagal Police : कागलमध्ये पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा, ४८ संशयितांवर गुन्हा दाखल

कोल्हापूर : कागलच्या करंजे पाणंद येथे यशवंत कला, क्रीडा, सांस्कृतिक मंडळ नावाने पत्र्याच्या बंदिस्त शेडमध्ये सुरू असलेल्या मोठ्या जुगार अड्ड्यावर कागल पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. गुरुवारी दुपारी करण्यात आलेल्या कारवाईबद्दल गोपनीयता बाळगण्यात आली. जुगार अड्डामालक, कामगार, जुगार खेळणारे अशा ४८ संशयितांवर गुन्हा नोंदविण्यात आला. या कारवाईत रोख ९३ हजार रुपये, पंधरा मोबाईल असा सुमारे दीड लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Chikkodi News : हिरेकोडीत ८५ विद्यार्थी अस्वस्थ, निवासी शाळेतील घटना

चिक्कोडी : अन्नातून विषबाधा झाल्याने ८५ शालेय विद्यार्थी अस्वस्थ झाल्याची घटना हिरेकोडी येथील मोरारजी देसाई निवासी शाळेत शुक्रवारी (ता. १२) सकाळी घडली. प्रशासनाने मुलांना दोन सरकारी रुग्णालयांत दाखल केले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती सुधारत असल्याचे आरोग्याधिकाऱ्यांनी सांगितले.

PM Modi LIVE : हिंसाचारात होरपळून निघालेल्या मणिपूरला पंतप्रधान मोदी आज देणार भेट

नवी दिल्ली : वांशिक संघर्षामुळे उसळलेल्या हिंसाचारात होरपळून निघालेल्या मणिपूरला पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (ता. १३) भेट देणार आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी मणिपूरमधील ७ हजार ३०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी करतील. मोदी हे मिझोराम, आसाम, पश्चिम बंगाल आणि बिहारचाही दौरा करतील. त्यांचा हा दौरा १५ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. पंतप्रधान मोदी आज सकाळी मिझोराममधील ऐजॉल येथे नऊ हजार कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या प्रकल्पांचे उद्घाटन करतील.

Sushila Karki News : नेपाळ पंतप्रधानपदी सुशीला कार्की, हंगामी सरकारच्या प्रमुख बनल्या

काठमांडू : नेपाळमधील राजकीय अराजकतेच्या पार्श्वभूमीवर नेतृत्वाच्या शर्यतीमध्ये माजी न्यायाधीश सुशीला कार्की यांनी बाजी मारली असून, त्या हंगामी सरकारच्या प्रमुख बनल्या आहेत.

C. P. Radhakrishnan News : सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपतिपदाची शपथ

Latest Marathi Live Updates 13 September 2025 : राज्यातील ३४ जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यांतील राजकारणात नव्या घडामोडींना वेग येणार आहे. तसेच सी. पी. राधाकृष्णन यांनी देशाचे पंधरावे उपराष्ट्रपती म्हणून शुक्रवारी शपथ घेतली. राष्ट्रपती भवनातील सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. नेपाळमधील राजकीय अराजकतेच्या पार्श्वभूमीवर नेतृत्वाच्या शर्यतीमध्ये माजी न्यायाधीश सुशीला कार्की यांनी बाजी मारली असून, त्या हंगामी सरकारच्या प्रमुख बनल्या आहेत. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले हे रविवारी (ता. १४) कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. नांदणी (ता. शिरोळ) येथील बहुचर्चित ‘महादेवी हत्तीण’ मठाकडे पाठविण्यासाठी उच्चस्तरीय समितीने निर्णय घेण्यासंदर्भातचा आदेश शुक्रवारी (ता. १२) सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकार व मठाकडून करण्यात आलेल्या पुनर्विचार याचिकेवर दिला. वांशिक संघर्षामुळे उसळलेल्या हिंसाचारात होरपळून निघालेल्या मणिपूरला पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (ता. १३) भेट देणार आहेत. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.