Astrological prediction : मोठी राजकीय उलथापालथ, राजाबद्दल मोठं भाकीत, भूकंप, महापूर; 2026 मध्ये भारतात काय-काय घडणार?
Tv9 Marathi September 15, 2025 07:45 AM

भारतात 2025 मध्ये एकापाठोपाठ अशा काही घटना घडल्या, ज्यामुळे संपूर्ण देश प्रभावित झाला. कुंभमेळाव्यामध्ये चेंगराचेंगरी झाली, आगीच्या अनेक घटना घडल्या, पहलगाममध्ये हल्ला झाला, त्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवलं. अहमदाबादमध्ये विमान कोसळलं, भूकंप देखील आला. अशा अनेक घटनांमुळे देश हादरला.आता आपण 2025 वर्षांच्या अंतिम टप्प्यात आहोत. पुढील काही महिन्यांमध्येच 2026 वर्ष सुरू होणार आहे, त्यामुळे सहाजिकच अनेकांच्या मनात असा प्रश्न असू शकतो की? 2026 हे वर्ष कसं जाणार? त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

2026 या वर्षाची ग्रहस्थितीच अशी आहे की, या काळात काही मोठ्या घटना घडणार आहेत, ज्याचा प्रभाव हा देशातच नाही तर संपूर्ण जगावर पडणार आहे. 2026 या वर्षामध्ये अशा काही घटना घडतील ज्यामुळे देशाचं राजकारण आणि अर्थकारण ढवळून निघेल, मोठ्याप्रमाणात राजकीय उलथापालथी पहायला मिळू शकतात असं भाकीत ज्योतिषांनी केलं आहे.

भयानक घटना घडतील

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार 2026 मध्ये ज्या घटना घडणार आहेत, त्या खूप भयानक अशा स्वरुपाच्या असणार आहेत. ज्यामध्ये काही मोठ्या नैसर्गिक संकटांची शक्यता आहे. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात मनुष्य आणि वित्तहानी होऊ शकते. 2026 मध्ये काही ठिकाणी दुष्काळ तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. भारतीय राजकारणात मोठी उलथापालथ पहायला मिळू शकते. दहशतवादी हल्ल्यांमध्ये वाढ होईल, असं भाकीत वर्तवण्यात आलं आहे, त्यामुळे या वर्षात विशेष सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. वैदिक ज्योतिषानुसार गुरु ग्रह 2026 मध्ये जूनपर्यंत बुधाची राशी असलेल्या मिथून राशीमध्ये आणि त्यानंतर 2 जून पासून 31 ऑक्टोबरपर्यंत कर्क राशीमध्ये गोचर करणार आहेत, ही अशी स्थिती आहे की, या काळात देशावर भयंकर मोठी नैर्सिग संकट येऊ शकतात.

भारताची ताकद वाढणार

दरम्यान देशाच्या राजाबद्दल देखील मोठं भाकीत करण्यात आलं आहे, 2026 मध्ये अशी ग्रहस्थिती आहे की, भारताच्या शक्तिमध्ये अनेक पटींनी वाढ होणार आहे, भारत आपल्या शत्रू राष्ट्रांचा सहज पराभव करणार आहे, मात्र सोबतच देशावर काही वेळेला युद्धाचे ढग देखील बघायला मिळू शकतात. त्यामुळे युद्धाची भीती देखील राहणार आहे. राजाचा मान वाढणार असून, जगभरात कामांचा डंका वाजणार आहे, असं भाकीत वर्तवण्यात आलं आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.