शोएब अख्तर इंड. पाक नाही शेक हँड्स एशिया कप 2025: आशिया चषक 2025 स्पर्धेच्या (Asia Cup 2025) साखळी सामन्यात भारताने पाकिस्तानचा (India vs Pakistan) सात विकेट्सनी धुव्वा उडवला. दुबईच्या मैदानात खेळवण्यात आलेल्या या सामन्यात पाकिस्ताननं भारतासमोर 128 धावांचं सोपं लक्ष्य ठेवलं होतं. भारतानं हे आव्हान 16 व्या षटकातच पार केलं आणि पाकिस्तानविरुद्ध दणदणीत विजय मिळवला.
पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील राजकीय संबंध ताणले गेले आहेत. त्यामुळे भारतानं पाकिस्तानविरुद्ध खेळू नये अशी अनेक देशवासीयांची भावना होती. मात्र सरकारनं बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळण्याची बीसीसीआयला परवानगी दिल्यानं आशिया चषकात खेळवण्याचा भारताचा मार्ग मोकळा झाला. बीसीसीआयने परवानगी दिल्यानंतर देशभरातून अनेक चाहत्यांची पाकिस्तानविरुद्ध खेळू नका, अशा भावना व्यक्त केल्या. देशभरातून विविध प्रतिक्रिया येत होत्या. या भारतीयांच्या भावनेचा आदर टीम इंडियाच्या खेळाडूंनी ठेवला. दुबईच्या मैदानात टीम इंडियानं दणदणीत विजय साजरा केला. तसेच विजयानंतर टीम इंडियाने पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत हस्तांदोलन करणं टाळलं.
दुबईच्या मैदानात टीम इंडियानं दणदणीत विजय साजरा केला. तसेच विजयानंतर टीम इंडियाने पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत हस्तांदोलन करणं टाळलं. भारत आणि पाकिस्तान सामन्याची जेव्हा नाणेफेक झाली. त्यावेळी देखील सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधारासोबत हस्तांदोलन केलं नाही. त्यानंतर सामन्यात विजयी षटकार ठोकताच सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे एकमेकांना अभिनंदन करत मैदानाबाहेर गेले. त्यानंतर भारताच्या इतर खेळाडूंनी एकमेकांना हस्तांदोलन करत ड्रेसिंग रुमचा रस्ता धरला. यादरम्यान पाकिस्तानचे सर्व खेळाडू हस्तांदोलन करण्यासाठी वाट बघत होते. परंतु भारताचे सर्व खेळाडूंनी ड्रेसिंग रुममध्ये जात दरवाजाही बंद करुन टाकला. भारताच्या खेळाडूंची ही भूमिका पाहता पाकिस्तानचे सर्व खेळाडूंनी देखील त्यांच्या ड्रेसिंग रुमचा रस्ता धरला.
टीम इंडियाने पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत हस्तांदोलन टाळल्यानंतर पाकिस्तानला चांगलीच मिरची झुंबल्याचे दिसत आहे. सदर प्रकरणावर पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब अख्तरने प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय संघ चांगला खेळला. हा क्रिकेट सामना होता, त्याला राजकीय रंग देऊ नका. आम्ही तुमच्यासाठी चांगल्या गोष्टींबद्दल बोलत आहोत.हस्तांदोलन करा. हा क्रिकेटचा खेळ आहे. जर मी असतो, तर नक्कीच हस्तांदोलन केले असते. मारामारी होतात, त्या घरीही होतात. याचा अर्थ असा नाही की तुम्ही ते वाढवत राहा. मी ते करू शकत नाही, असं शोएब अख्तर म्हणाला.
सलामीच्या अभिषेक शर्मानं अवघ्या 13 चेंडूत चार चौकार आणि 2 षटकारांसह 31 धावा फटकावल्या. पण शुभमन गिल 10 धावांवर बाद झाला. त्यानंतर तिलक वर्मा आणि कर्णधार सूर्यकुमार यादवनं तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागिदारी साकारली. सूर्यकुमारनं नाबाद 47 तर तिलक वर्मानं 31 धावा केल्या. त्याआधी कुलदीप यादव आणि अक्षर पटेलच्या फिरकीसमोर पाकिस्तानी फलंदाजांनी अक्षरश: गुडघे टेकले.पाकिस्तानला 20 षटकात 9 बाद 127 धावांचीच मजल मारता आली. कुलदीप यादव आणि अक्षर पटेल या फिरकी जोडगोळीनं अवघ्या 36 धावात 5 फलंदाजांना माघारी धाडलं. तर जसप्रीत बुमरानं 2 आणि हार्दिक पांड्या, वरुण चक्रवर्तीनं प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. पाकिस्तानचा सलामीवीर साहिबजादा फरहाननं सर्वाधिक 40 धावा केल्या. त्यानंतर एकाही फलंदाजाला फारसा प्रभाव पाडता आला नाही.
पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील राजकीय संबंध ताणले गेले आहेत. त्यामुळे भारतानं पाकिस्तानविरुद्ध खेळू नये अशी अनेक देशवासीयांची भावना होती. मात्र सरकारनं बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळण्याची बीसीसीआयला परवानगी दिल्यानं आशिया चषकात खेळवण्याचा भारताचा मार्ग मोकळा झाला. विशेष म्हणजे भारताने सामना जिंकताच सूर्यकुमार यादवने सर्वांची मनं जिंकली. सामना संपल्यानंतर सूर्यकुमार यादवने पहलगाम हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहिली. मला काहीतरी सांगायचं आहे आणि त्यासाठी हे ठिकाण अधिक योग्य आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या भारतीयांना भावपूर्ण श्रद्धांजली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांच्या कुटुंबांसोबत आम्ही ठामपणे उभे आहोत. हा विजय आम्ही आपल्या शूरवीर सैन्यदलाला समर्पित करू इच्छितो, ज्यांनी अतुलनीय शौर्य दाखवले. ते आम्हाला सतत प्रेरणा देत राहोत आणि आम्हालाही संधी मिळाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटवण्यासाठी आणखी कारण देता यावं, अशी आम्ही आशा करतो, असं सूर्यकुमार यादव म्हणाला.
https://www.youtube.com/watch?v=5gbguam-hl0
आणखी वाचा