जर्सी स्पॉन्सरशिपमधून टीम इंडियाला मिळणार 579 कोटी, पाकिस्तानची लायकी काय आहे ते वाचा
GH News September 16, 2025 11:18 PM

भारतीय क्रिकेट संघाला नवा जर्सी स्पॉन्सर मिळाला आहे. आशिया कप स्पर्धेपूर्वी बीसीसीआय आणि ड्रीम इलेव्हन यांच्यातील करार वेळेआधीच संपुष्टात आला होता. केंद्र सरकारने बिल पास केल्यानंतर हा करारा संपुष्टात आला होता. त्यामुळे आशिया कप स्पर्धेत भारताला विना स्पॉन्सर उतरावं लागलं होतं. पण भारतीय संघाला ही स्पर्धा सुरु असताना नवा स्पॉन्सर मिळाला आहे. अपोलो टायर्सने अडीच वर्षांसाठी टीम इंडियाच्या जर्सीचं प्रायोजकत्व घेतलं आहे. यासाठी अपोलो टायर्स बीसीसीआयला एकूण 579 कोटी रुपये देणार आहे. पुढच्या अडीच वर्षांच्या कालावधीत भारतीय संघाच्या 121 द्विपक्षीय मालिका आणि आयसीसी स्पर्धेतील 21 सामने खेळणार आहे. या प्रत्येक सामन्यात जर्सीवर अपोलो टायर्स प्रायोजक असणार आहे. मागच्या कराराच्या बीसीसीआयच्या तिजोरीत जास्तीचे पैसे पडणआर आहेत. पण असं असताना भिकारड्या पाकिस्तान संघाला किती पैसे मिळत असतील अशी चर्चा रंगली आहे. चला जाणून घेऊयात

पाकिस्तान संघाचा जर्सी स्पॉन्सरशिप प्रसिद्ध सॉफ्ट ड्रिंक कंपनी पेप्सीकडे आहे. मागच्या काही वर्षांपासून पेप्सी आणि पाकिस्तान क्रिकेटचं घट्ट नातं तयार झालं आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि पेप्सीत हा करार 48 कोटींचा आहे. पण याबाबत अधिकृत अशी काहीच माहिती नाही. फक्त एक रिपोर्ट आहे. पण हा रिपोर्ट असला तर पाकिस्तान क्रिकेटची लायकी दिसून येते. पाकिस्तानच्या तुलनेच भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सी स्पॉन्सरची किंमत ही दहा पटीने अधिक आहे. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड बीसीसीआयच्या आसपास देखील नाही.

भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सी स्पॉन्सरशिपची जबाबदारी अनेक कंपन्यांनी पार पाडली. सहारा, विल्स, स्टारसारख्या अनेक कंपन्यांनी भारतीय संघाला जर्सी प्रायोजकत्व दिलं आहे. टीम इंडियाला पहिल्या आयटीसीने स्पॉन्सर केलं होतं. जवळपास हे नातं आठ वर्षे चाललं. त्यानंतर 2001 ते 2013 या कालावधीत सहाराने टीम इंडियाला स्पॉन्सर केलं. त्यानंतर 2014 ते 2017 या कालावधीत स्टार इंडिया कंपनीने पुढाकार घेतला. चायना कंपनी ओपोने 2017 ते 2019 या कालावधीत ही जबाबदारी पार पडली. तर 2019 ते 2023 मध्ये बायजू कंपनीला हा मान मिळाला होता. त्यानंतर ड्रीम इलेव्हनने टीम इंडियाला प्रायोजकत्व दिलं. आता या यादीत अपोलो टायर्सचं नाव समाविष्ट झालं आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.