वैद्यकीय अधिकाऱ्याचा महागडा मोबाईल फोन चोरीला
ठाणे, ता.१६: संभाजीनगर येथील वैद्यकीय अधिकारी हे आई आणि बहिणीसह ठाण्यात भांडी खरेदी करताना, त्यांचा ५० हजार रुपये किंमतीचा आयफोन १४ प्रो हा मोबाईल फोन चोरीला गेला आहे. फोन चोरटा त्या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
संभाजीनगर येथील निलजगाव, प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी (४६) हे नौपाड्यात राहणारे आहेत. सुट्टी व रजेचे दिवशी ते कुटुंबास भेटण्यास आले होते. सोमवार (ता.१५) सप्टेंबर दुपारी दोन वाजता नौपाड्यातील गावदेवी मैदान पार्किंग जवळ ते आणि त्यांची आई व बहीण असे तिघे भांडी खरेदी करण्यासाठी गेले असताना दुकानात भांडी पाहत असताना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांचा मोबाईल फोन त्या दुकानाच्या काउंटरवर ठेवला. भांडी खरेदी करून झाल्यावर दुकानाच्या काउंटरवर ठेवलेला मोबाईल घेण्यासाठी गेले असता फोन मिळून आला नाही. म्हणून त्यांनी दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरा पाहताच, अडीच वाजण्याच्या सुमारास दुकानात आलेल्या एका अनोळखी व्यक्तीने काउंटरवरील मोबाईल फोन चोरून घेऊन जाताना दिसत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.