कांद्याच्या भावामध्ये आळेफाटा येथे घट
esakal September 17, 2025 12:45 PM

आळेफाटा, ता. १५ : जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा येथील उपबाजार समितीत रविवारी (ता.१६) १७ हजार ५४ कांदा पिशव्यांची विक्रमी आवक झाली. चांगल्या कांद्यास दहा किलोस १५१ रुपये बाजारभाव मिळाला. कांद्याच्या बाजारभावात घट झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली
बाजारातील लिलावात एक नंबर सुपर गोळा कांद्यास दहा किलोस १४० ते १५१, एक नंबरला १३० ते १४०, दोन नंबरला ११० ते १२०, तीन नंबरला ८० ते १००, तर बदला, चिंगळी कांद्यास १० ते ६० रुपये बाजारभाव मिळाला.
दरम्यान, . सध्या मिळणारा बाजारभाव अत्यंत कमी असून, मिळणाऱ्या बाजारभावातून उत्पादन खर्च देखील निघत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.