Crime News : जमिनीच्या वादातून अपहरण करत हत्या; शहापूर तालुक्यातील घटनेने खळबळ
Saam TV September 17, 2025 12:45 PM

फैय्याज शेख 
शहापूर
: जमिनीचा वाद असल्याने या वादातून शहापूर तालुक्यात खळबळजनक घटना समोर आली आहे. वादातून अपहरण करून एका व्यक्तीची हत्या करण्यात आल्याची घटना शहापूर तालुक्यातील प्रधानपाडा येथे घडली आहे. घटनेप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला आहे. 

शहापूरतालुक्यातील प्रधानपाडा येथे वास्तव्यास असलेला रामदास चंदर गोरखने (वय ४७) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान सोमवारी सायंकाळी रामदास याच्या घरी काहीजण आले. त्यांनी रामदास यास गाडीत बसवून घेऊन गेले होते. मात्र रात्री उशिरापर्यंत वडील घरी आले नाही; म्हणून मुलाने नातेवाईकांच्या मदतीने त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. 

Akola Crime : दगडाने ठेचून एकाची निर्घृण हत्या; मारेकरी मृतदेहाजवळ जाऊन झोपला, अकोला जिल्हा रुग्णालयातील घटना

रस्त्याच्या कडेला मृतावस्थेत आढळले 

दरम्यान रात्री तीन वाजेच्या सुमारास मुंबई- नाशिक महामार्गावर कुकंबा रस्त्यावर समृद्धी महामार्गाच्या बाजूला रामदास गोरखने हे पडलेल्या अवस्थेत आढळून आले. यानंतर त्यांना रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.  याबाबत शहापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. 

Pachora Heavy Rain : पाचोरा तालुक्यात ढगफुटी; पुराच्या पाण्यात शेकडो पशुधन गेले वाहून, ग्रामस्थांनी रात्र काढली जागून

फरार तिघांचा शोध सुरु  

नातेवाईकांच्या सांगण्याहून उंबरखांड येथील सुनिल निमसेच्या जीपमधून घेवून गेले होते. त्यानुसार सुनिल निमसे यास पोलिसांनी ताब्यात घेतले. तर तपास केला असता योगेश सोनवणे (रा. लाहेगाव) याच्यासह दोन जण होते. यामुळे हे तिन्ही फरार असून शहापूर पोलिस यांचा शोध घेत आहेत. तर रामदास गोरखने याचा मृत्यू नेमका कोणत्या शस्त्राने केले आहे. या करीता मृतदेह शवविच्छेदनासाठी फाॅरेन्सिक लॅब मुंबई जेजे येथे पाठवण्यात आले आहे. शहापूर पोलिसांनी पथक तयार केले असून फरार आरोपींचा शोध सुरू केला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.