शेतकऱ्यांना सुविधा देण्यास बाजार समिती कटिबद्ध
esakal September 17, 2025 12:45 PM

इंदापूर, ता.१६ : ‘‘इंदापूर बाजार समितीच्या वतीने मुख्य बाजार इंदापूर येथे शेतकरी निवास, उपबाजार भिगवण येथे आधुनिक शॉपिंग मॉल, मुख्य बाजार इंदापूर शहर व उपबाजार निमगाव-केतकी येथे नवीन पेट्रोल पंप व इतर शेतकरी घटकांकरिता शेतमाल खरेदी-विक्री आनुषंगिक सोयी-सुविधा उभारणीचे धोरण आहे. यापुढे शेतकऱ्यांना अधिक अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी बाजार समिती कटिबद्ध आहे,’’ अशी ग्वाही इंदापूर बाजार समितीचे माजी सभापती व पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे यांनी दिली.

इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती व तालुका सहकारी खरेदी-विक्री संघ यांची आर्थिक वर्षाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (ता.१४) सभापती तुषार देवराज जाधव यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी इंदापूर बाजार समितीचे उपसभापती मनोहर ढुके,संचालक माजी आमदार यशवंत माने, विलासराव माने, दत्तात्रेय फडतरे, मधुकर भरणे, रोहित मोहोळकर, संग्रामसिंह निंबाळकर, संदीप पाटील, रूपाली संतोष वाबळे, मंगलताई गणेशकुमार झगडे, आबा देवकाते, संतोष गायकवाड, अनिल बागल, दशरथ पोळ, रोनक बोरा, सुभाष दिवसे, खरेदी-विक्रीचे अध्यक्ष प्रताप पालवे, विजय घोगरे, हरिभाऊ जाधव, बाळासाहेब जगताप, प्रतीक घोगरे, मकरंद जगताप,अमोल भोईटे, रामचंद्र रूपनवर, सचिन जाधव, जाऊद्दीन शेख, कैलास येरळकर, रवींद्र सरडे, जयंत जाधव, विष्णू देवकाते आदी उपस्थित होते.

यावेळी देवराज जाधव, अंकुश जाधव, गजानन जगताप, अभिजित माने, दशरथ यादव, कांतिलाल झगडे, दत्तात्रेय सवासे, दत्तात्रेय सपकळ, नंदकुमार रणवरे, चित्तरंजन पाटील, अजिनाथ बोराडे, उत्तरेश्वर गोलांडे, दिनकर नलवडे, डी.डी. देवकर, महावीर गांधी, बळिराम बोंगाणे, बापूराव यादव, तात्यासाहेब वडापुरे, हनुमंत शिंदे, संतोष देवकर, नवनाथ शिंदे उपस्थित होते. संग्रामसिंह निंबाळकर यांनी आभार मानले.


06275

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.