Dashavatar Movie: 'दशावतार चित्रपटात सोलापुरी आवाज'; साहिल कुलकर्णी चित्रपटाचे क्रिएटिव्ह एक्झिक्युटिव्ह, गाणेही गायले
esakal September 17, 2025 10:45 AM

सोलापूर: नुकताच प्रदर्शित झालेला व चर्चेतील ‘दशावतार’ चित्रपटात सोलापुरी आवाज घुमतोय. सोलापूरचा संगीतकार, पार्श्वगायक, परफॉर्मर गिटारवादक साहिल कुलकर्णी याने या चित्रपटात क्रिएटिव्ह एक्झिक्युटिव्ह म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. या बरोबर यातील ऋतुचक्र हे गाणेही गायले आहे.

Satara Hill Marathon 2025: 'सातारा हिल मॅरेथॉनमध्ये श्रीरामपूरचा झेंडा'; दविंदरसिंग धुप्पड यांची सुवर्ण कामगिरी, सहा रौप्य, दोन ब्राँझपदके

अंत्रोळीकर नगरातील साहिल कुलकर्णी या तरुण गायकाने सोलापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. हरिभाई देवकरण प्रशालेचा विद्यार्थी असलेला साहिल याने आजवर सुमारे साडेतीन हजार लाइव्ह शोचे सादरीकरण केले आहे. अनेक चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन व गायन केले आहे. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या कसदार अभियानामुळे दशावतार चित्रपट सध्या चांगलाच गाजतोय.

तळकोकणातील लोककला दशावतारी नाटक व त्यातील कलावंताची कलेवरील श्रद्धा दृढ निष्ठा अधोरेखित करण्याचे काम हा चित्रपट करतो. यामधील ऋतुचक्र हे गीत साहिल कुलकर्णी याने गायले आहे. बहरती मोहरती काळासंगे ...‘रान भिलोरी भरल्या आभाळी मेघाच्या ओल्याचिंब कावडीहो’ हे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्याचे गीतकार गुरू ठाकून हे आहेत. तर संगीत ए. व्ही. प्रफूल्लचंद्र यांनी दिले आहे. साहिलबरोबर स्वानंदी सरदेसाई ही गायिका आहे. मराठी चित्रपटासोबत हिंदी चित्रपटासाठीदेखील साहिलचे काम सुरू आहे. आत्मीय सुरेल धून आणि आधुनिक संगीतशैली यांचा सुंदर मेळ साधत, साहिल यांनी हिंदी, मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

लाइव्ह शोसोबतच साहिल याने चित्रपट आणि वेब सिरिजीमध्येही पार्श्वगायक म्हणून काम केले आहे. हिंदी चित्रपट ‘बर्खा सरकार’चे संगीत दिग्दर्शक व पार्श्वगायक म्हणून काम पाहिले आहे. मराठी चित्रपट मेकअप, धुरळा, कॅफ्युसिनो, जवानी झिंदाबाद, इंग्रजी चित्रपट रूबी ॲड टर्टल, मराठी चित्रपट टीटीएमएम मधील ‘साजिरी गोजिरी’ हे गाणं तसेच घर बंदूक बिर्याणी, गोदावरी, विषय हार्ड या चित्रपटांसाठी पार्श्वगायन तसेच संगीत दिग्दर्शनाचे काम केले आहे.

Sonali Kulkarni:'सोनाली कुलकर्णीकडून सिद्धेश्वर एक्स्प्रेसचे कौतुक'; समाज माध्यमात शेअर केला व्हिडिओ पुरस्कार अन् सन्मान

साहिल कुलकर्णी याला मिर्ची म्युझिक अवॉर्ड २०२०-२१ मध्ये मिळाला होता. तसेच झी गौरव पुरस्कार सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक,२०८-१९ व सिटी सिने ॲवॉर्ड्स, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक २०१९-२० चे नामांकन मिळाले होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.