91935
तालुकास्तर खो-खो स्पर्धेत
रेकोबा हायस्कूलचा दबदबा
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १६ : क्रीडा व युवा संचलनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग व जिल्हा क्रीडा परिषद सिंधुदुर्ग व मालवण क्रीडा समिती, मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने रेकोबा हायस्कूल वायरी मालवण येथे झालेल्या तालुकास्तरीय शालेय खो-खो स्पर्धेत रेकोबा हायस्कूलच्या १४ वर्षांखालील मुलांच्या संघाने विजेतेपद पटकाविले. जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली. तसेच १७ वर्षाखालील मुलींच्या संघाने उपविजेतेपद पटकावले.
१४ वर्षांखालील मुलांच्या संघांमध्ये कार्तिक रावले, हर्षल मोरजकर, मयूर चव्हाण, गौरंग मालंडकर, लक्ष्मण झोरे, जीत लुडबे, केदार मसूरकर, चैतन्य आळवे, विराट मेस्त, तर १७ वर्षांखालील मुलींमध्ये श्रेया करंगुटकर, प्रज्ञा पवार, मानसी धुरत, स्वप्नाली भगत, सानिका झोरे, खुशी सावंत, योगिता जोशी, सनिशा देऊलकर, जिया शिरोडकर, निधी म्हापणकर, वैष्णवी तोंडवळकर, रिधीमा परकर हे खेळाडू सहभागी झाले. या दोन्ही संघांना क्रीडाशिक्षक श्रीनाथ फणसेकर यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था पदाधिकारी, शालेय समिती पदाधिकारी तसेच मुख्याध्यापक श्री. खोचरे आदींनी अभिनंदन केले.