पिंपरी : उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडमध्ये सलग तिसऱ्या दिवशी बरसलेल्या पावसाने दाणादाण उडाली. रविवारी (ता.१४) रात्रीपासून संततधार सुरूच होती. सोमवारी (ता.१५) पहाटेपासूनच पावसाने जोर धरला होता. सकाळीही तो कायम होता. दुपारनंतर पावसाने उघडीप दिली.
सकाळी कामानिमित्त व कार्यालयात जाण्यासाठी घराबाहेर पडणारे कर्मचारी तसेच शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची आठवड्याच्या पहिल्याच दिवशी तारांबळ उडाली. अनेकांनी पावसामुळे चारचाकी वाहनांनी प्रवास करणे पसंत केल्याने सोमवारी सकाळी काही भागात वाहतूक कोंडीही झालेली दिसून आली.
शनिवारपासून पाऊस सुरू असल्यामुळे शहरातील बहुतेक रस्ते जलमय झाले आहेत. अनेक ठिकाणी खड्डे पडल्यामुळे त्यातून मार्ग काढणे नागरिकांना जिकरीचे ठरत होते. दुपारी बारा वाजल्यानंतर पावसाने काहीशी विश्रांती घेतली, तरी ढगाळ हवामान व तुरळक पडणाऱ्या सरींमुळे वातावरणात गारवा होता.
पवना धरण १०० टक्के भरलेशहराप्रमाणेच मावळातही पावसाने हजेरी लावल्याने पवना धरण शंभर टक्के भरले. त्यामुळे सोमवारी दुपारी एक वाजल्यापासून धरणातून एक हजार क्युसेक्सने विसर्ग करण्यात आला. धरणातून सोडण्यात येणारे पाणी व पिंपरी, चिंचवड, निगडी, आकुर्डी, रावेत, थेरगाव, सांगवी, पिंपळे निलख, पिंपळे गुरव, भोसरी या भागातही झालेल्या जोरदार पावसामुळे पवना नदीच्या पाणीपातळीत काही प्रमाणात वाढ झालेली दिसून आली.
रस्त्यांची आणखी दुरवस्थासलग तीन दिवस पाऊस पडत असल्याने शहरातील रस्त्यांची दुरवस्था अाणखी वाढली आहे. आधीच्या पावसामुळे पडलेले अनेक खड्डे बुजविण्यात आले नव्हते. त्यातच नव्या खड्ड्यांची भर पडल्याने रस्त्यांची चाळण झाल्याचे चित्र बहुतांश ठिकाणी दिसून आले.
पाच ठिकाणी झाडपडीपावसामुळे सोमवारी दोन तासांमध्ये पाच ठिकाणी झाडपडीच्या घटना घटल्या. सकाळी आठ वाजता पिंपरीतील मोरवाडी चौकाजवळ झाड पडले. याशिवाय एमआयडीसी भोसरी, पिंपळे निलख, रहाटणी, वाल्हेकरवाडी या ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्याची माहिती अग्निशामक दलाच्या वतीने देण्यात आली आहे.
Ram Shinde: जलद-सुखद प्रवासाची सुविधा मिळणार: सभापती राम शिंदे; वंदे भारत एक्स्प्रेसचे अहिल्यानगर रेल्वे स्थानकात स्वागत सलग तिसऱ्या दिवशी पाऊसशनिवारपासून पाऊस हजेरी लावत आहे. शनिवारी सकाळी तासभर झालेल्या पावसाने नंतर विश्रांती घेतली होती. मात्र, रविवारपासून सरी बरसत आहेत. रविवारी सकाळी थोडे ऊन पडले होते, मात्र दुपारी बाराच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. सायंकाळी पावसाने काहीशी उघडीप दिली होती. मात्र, रविवारी रात्रभर पडणाऱ्या संततधार पावसाचा जोर सोमवारी दुपारपर्यंत कायम होता.