देवीच्या उपासनेत रंगांचे महत्त्व तुम्हाला ठाऊक आहे का?
esakal September 18, 2025 11:45 AM

Navratri colors

नऊ रंग

नवरात्रीच्या नऊ दिवसात रंगांना एवढे महत्व का दिले जाते. देवीच्या उपासनेत या रंगांचे महत्व काय आहे जाणून घ्या.

Navratri colors

शैलपुत्री - पांढरा

नवरात्रीचा पहिला दिवस देवी शैलपुत्रीला समर्पित आहे. पांढरा रंग शुद्धता, शांती आणि साधेपणा दर्शवतो. हा रंग देवीच्या निर्मळ रूपाचे प्रतीक मानला जोतो.

Navratri colors

ब्रह्मचारिणी - लाल

दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाते. लाल रंग प्रेम, ऊर्जा, शक्ती आणि उत्साहाचे प्रतीक आहे. हा रंग शौर्य आणि निर्भयता दर्शवतो.

Navratri colors

चंद्रघंटा - गडद निळा

तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची उपासना होते. गडद निळा रंग समृद्धी, शांतता आणि दैवी शक्तीचे प्रतीक मानला जातो.

Navratri colors

कूष्मांडा - पिवळा

चौथ्या दिवशी कूष्मांडा देवीची पूजा केली जाते. पिवळा रंग आनंद, उत्साह आणि ज्ञानाचे प्रतीक आहे. हा रंग सकारात्मक ऊर्जा देतो.

Navratri colors

स्कंदमाता - हिरवा

पाचव्या दिवशी स्कंदमातेची उपासना होते. हिरवा रंग निसर्ग, वाढ, नवीन सुरुवात आणि समृद्धीचे प्रतीक मानला जोतो.

Navratri colors

कात्यायनी - राखाडी

सहाव्या दिवशी कात्यायनी देवीची पूजा केली जाते. राखाडी रंग नकारात्मकतेचा नाश आणि संतुलन दर्शवतो.

Navratri colors

काळरात्री - नारंगी

सातव्या दिवशी काळरात्री देवीची उपासना होते. नारंगी रंग उत्साह, आनंद आणि सकारात्मक ऊर्जा दर्शवतो.

Navratri colors

महागौरी - मोरपंखी हिरवा

आठव्या दिवशी महागौरी देवीची पूजा केली जाते. मोरपंखी हिरवा रंग वैयक्तिक वाढ, प्रेम आणि करुणेचे प्रतीक मानला जातो.

Navratri colors

सिद्धिदात्री - जांभळा

नवव्या आणि शेवटच्या दिवशी सिद्धिदात्री देवीची उपासना होते. जांभळा रंग महत्त्वाकांक्षा, शक्ती आणि समृद्धीचे प्रतीक म्हणून ओळखला जाोतो.

Navratri colors

रंगांचे आध्यात्मिक महत्त्व

हे रंग केवळ पोशाखासाठी नसतात, तर ते आध्यात्मिक ऊर्जेचे प्रतीक मानले जातात. हे रंग परिधान केल्याने देवीचा आशीर्वाद मिळतो आणि मन शांत व सकारात्मक राहते, अशी श्रद्धा आहे.

नवरात्रात घटासाठी कुठले धान्य वापरावे? येथे क्लिक करा
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.