भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 75 वर्षाचे झाले. मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देश आणि जगभरातील अनेक दिग्गजांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. अमेरेकिचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापासून ते जॉर्जिया मेलेन यामच्यापर्यंत अनेकांनी पंतप्रधानांचे अभिष्टचिंतन केले. एवढंच नव्हे तर व्हॅटिकन सिटीचे प्रमुख पोप लिओ XIV यांनीही पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांना निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो अशीही कामना त्यांनी केली.
बुधवारी पवित्र व्हॅटिकन सिटीमधील सेंट पीटर्स स्क्वेअरमध्ये 30 हजारांहून अधिक लोक पोपल ऑडियन्ससाठी जमले होते, हा एक विशेष मेळावा होता ज्यामध्ये पोप लिओ XIV हे उपदेश करतात आणि यात्रेकरूंना आशीर्वाद देतात.
याच पवित्र समारंभात, पोप लिओ XIV यांनी भारतीय अल्पसंख्याक संघटनेच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. तिथे युनिव्हर्सल कॅथोलिक चर्चचे आध्यात्मिक प्रमुख यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दीर्घायुष्य आणि चांगल्या आरोग्यासाठी आशीर्वाद दिले.
भारतीय शिष्टमंडळाने घेतली भेट
राज्यसभेचे खासदार सतनाम सिंग संधू, खासदार आणि माजी राजनयिक हर्षवर्धन श्रृंगला आणि आयएमएफ समन्वयक हिमानी सूद यांच्यासह आयएमएफ शिष्टमंडळासोबत झालेल्या भेटीदरम्यान पोप लिओ XIV यांनी पंतप्रधान मोदींच्या फोटोला आशीर्वाद दिला. यावेळी खासदार सतनाम सिंग संधू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शीख समुदायातील विशेष नातेसंबंधांची कहाणी सांगणारे ‘हार्ट टू हार्ट: रेव्हरन्स ऑफ अ सागा’ हे पुस्तक भेट दिले. .
ट्रम्प यांनीही मोदींना दिल्या शुभेच्छा
दरम्यान काल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी फोन केला. ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया साइट, ट्रुथ सोशलवरही मेसेज लिहीला होता. “माझे मित्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर खूप छान संभाषण झाले. मी त्यांना वाढदिवसानिमित्त खूप शुभेच्छा दिल्या. ते खूप चांगलं काम करत आहेत” असं त्यांनी मेसेजमध्ये नमूद केलं. पंतप्रधान मोदींनीही ट्रम्प यांचे आभार मानले.
तसेच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनीही पंतप्रधान मोदींना शुभेच्छा दिल्या. “प्रिय पंतप्रधान, तुमच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक अभिनंदन. आमच्या दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यात आणि विविध क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढविण्यात तुम्ही मोठे योगदान दिले आहे.” असे त्यांनी लिहीले.