Sangli News: 'आष्ट्यात शिवसेनेच्या उपोषणाला यश'; लेखी आश्वासन दिल्यानंतर खासदार धैर्यशील मानेंच्या हस्ते सरबत पिऊन उपाेषण सोडले
esakal September 18, 2025 07:45 PM

आष्टा: प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत बेघरांच्या घरकुलांसाठी शिवसेनेचे संघटक वीर कुदळे यांनी नगरपालिकेसमोर सुरू केलेले बेमुदत उपोषण नगरपालिका प्रशासनाने आज लेखी आश्वासन दिल्यानंतर खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते सरबत पिऊन सोडले.

Success Story:'विशाल केंजळेंची एमपीएससीमधून यशाला गवसणी'; जिद्दीच्या जाेरावर ११ वेळा सरळसेवा परीक्षेत सुयश, आई-वडिलांचे स्वप्न केलं पूर्ण

आष्टा नगरपालिका प्रशासनाने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत भूमिहीन, बेघरांसाठी नगरपालिकेत स्वतंत्र कक्ष स्थापन करून उद्यापासून (ता. १७) पात्र लाभार्थींचे अर्ज स्वीकारले जातील, असे मुख्याधिकारी अवधूत कुंभार, प्रशासकीय अधिकारी रघुनाथ मोहिते, तांत्रिक अभियंता प्रताप तंबावेकर यांच्याकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर वीर कुदळे यांनी उपोषण सोडले.

खासदार माने म्हणाले, ‘‘सामान्य बेघरांना हक्काचे घर मिळावे म्हणून शिवसैनिक वीर कुदळे यांनी उपोषण सुरू केले होते. या त्यांच्या लढ्याला यश मिळाले आहे. कुदळे म्हणजे सामान्य माणसांसाठी लढणारा ‘वीर’ अशी त्यांची ख्याती आहे. शेवटच्या बेघराला घर मिळेपर्यंत कुदळे व शिवसैनिक लढा सुरू ठेवतील. घरकुलांसाठी कागदपत्रे, ऑनलाइन प्रक्रियेसाठी शिवसैनिकांनी सर्वसामान्यांना मदत करावी.''

वीर कुदळे यांनी २००८ पासून सुरू असलेल्या लढ्याला यश मिळाले आहे. भविष्यातही सामान्यांसाठी लढा चालू ठेवला जाईल, असे सांगितले. प्रशासनाने आपला निर्णय सांगितल्यानंतर उपस्थित बेघरांनी आनंद उत्सव साजरा करत वीर कुदळे यांचे आभार मानले.

Smart Meter: मीटरचा हिशोब ‘स्मार्ट’ की फसवा?; वाढीव वीजबिलांमुळे ग्राहक संतप्त, दुरुस्तीसाठी महावितरण कार्यालयात रांगा

यावेळी भाजपचे अमोल पडळकर, लता पडळकर, शिवसेनेचे दिलीप कुरणे, राकेश आटुगडे, अर्चना माळी, डॉ. नंदकुमार आटुगडे, गणेश माळी, निवास खोत, गणेश सावंत यांच्यासह पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.