भारतीय क्रिकेट संघाने टी 20 आशिया कप 2025 स्पर्धेत आतापर्यंत धमाकेदार कामगिरी केलीय. भारताने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात साखळी फेरीतील पहिल्या दोन्ही सामन्यात विजय मिळवला. टीम इंडियाने यूएई आणि त्यानंतर पाकिस्तानवर मात करत सलग 2 सामने जिंकले. भारताने यासह ए ग्रुपमधून सुपर 4 मध्ये प्रवेश मिळवला. त्यानंतर आता टीम इंडिया साखळी फेरीतील आपला तिसरा आणि अंतिम सामना खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. टीम इंडियाला हा सामना जिंकून विजयी हॅटट्रिक करण्याची संधी आहे. तर ओमानचाही साखळी फेरीतील शेवटचा सामना आहे. ओमानला पहिल्या दोन्ही सामन्यात पराभूत व्हावं लागलंय. त्यामुळे ओमानचा शेवटच्या सामन्यात जाता जाता अविस्मरणीय कामगिरी करण्याचा प्रयत्न असणार आहे.
टीम इंडियाने साखळी फेरीतील आपल्या सलामीच्या सामन्यात यूएईवर 9 विकेट्सने एकतर्फी विजय मिळवला. भारताने 10 सप्टेंबरला यूएई विरुद्ध 58 धावांचं आव्हान हे अवघ्या 27 चेंडूत पूर्ण करत मोठ्या फरकाने विजय साकारला. त्यानंतर भारताने रविवारी 14 सप्टेंबरला पाकिस्तानचा 7 विकेट्सने धुव्वा उडवला. आता ओमान विरुद्धचा सामना कधी आणि कुठे पाहायला मिळेल? हे जाणून घेऊयात.
टीम इंडिया विरुद्ध ओमान सामना शुक्रवारी 19 सप्टेंबरला होणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध ओमान सामना अबुधाबातील शेख झायेद स्टेडियममध्ये होणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध ओमान सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरुवात होईल. तर 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
टीम इंडिया विरुद्ध ओमान सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर सोनी लिव्ह एपद्वारे मोबाईल आणि लॅपटॉपर लाईव्ह मॅच पाहायला मिळेल.
दरम्यान टीम इंडिया ए ग्रुपमधून पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी विराजमान आहे. तर दुसऱ्या स्थानी पाकिस्तान विराजमान आहे. भारत पाकिस्तान दोन्ही संघांनी प्रत्येकी 2-2 सामने जिंकले आहेत.तर यूएईने एकमेव सामना जिंकला. तर ओमान चौथ्या क्रमांकावर आहे. ओमानचे खेळाडू टीम इंडिया विरुद्ध कशी कामगिरी करतात? याकडे टीम मॅनजमेंटचं लक्ष असणार आहे.