आशिया कप 2025 स्पर्धेतील 12 व्या सामन्यात ए ग्रुपमधील 2 संघ आमनेसामने आहेत. या सामन्यात भारत विरुद्ध ओमान यांच्यात टक्कर होणार आहे. दोन्ही संघांचा हा साखळी फेरीतील तिसरा आणि अंतिम सामना आहे. सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. टीम इंडियाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कर्णधार सू्र्यकुमार यादव याने बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघांनी आपल्या साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल केले आहेत.
कॅप्टन सूर्याने प्लेइंग ईलेव्हनमध्ये 2 बदल केले आहेत. जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्ती या दोघांना विश्रांती दिली आहे. तर हर्षित राणा आणि अर्शदीप सिंह या दोघांचा समावेश करण्यात आला आहे. या दोघांचा हा या स्पर्धेतील पहिलावहिला सामना असणार आहे. त्यामुळे हे दोघे बॉलिंगने कसं योगदान देतात याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : अभिषेक शर्मा, शुबमन गिल, संजू सॅमसन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव (कॅप्टन), तिलक वर्मा, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, हर्षित राणा, अर्शदीप सिंग आणि कुलदीप यादव.
ओमान प्लेइंग ईलेव्हन : आमिर कलीम, जतिंदर सिंग (कर्णधर), हम्माद मिर्झा, विनायक शुक्ला (विकेटकीपर), शाह फैसल, जिक्रिया इस्लाम, आर्यन बिश्त, मोहम्मद नदीम, शकील अहमद, समय श्रीवास्तव आणि जितेन रामानंदी.