आशिया कप २०२५ स्पर्धेतील साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात भारत आणि ओमान हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात भारताचं पारडं जड होतं. पण ओमानने भारतीय संघाला विजयासाठी चांगलंच झुंजवलं.एकंदरीत भारताने ओमानविरुद्धचा सामना जिंकला असला तरी ओमानने क्रीडारसिकांची मनं जिंकली आहेत. भारताने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी स्वीकारली. भारताने प्रथम फलंदाजी करताना बरेच प्रयोग केले. या प्रयोगाचा इतका भडिमार झाला की कर्णधार सूर्यकुमार सर्वात शेवटी राहिला. त्यामुळे या रणनीतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं. इतकंच काय भारतीय फलंदाजांची संथ फलंदाजीवर टीका होत आहे. असं सर्व असातना कर्णधार सूर्यकुमार यादवने सर्व प्रश्नांची उत्तरं दिलं. सुपर ४ मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने काय रणनिती आखली याबाबतही कर्णधार सूर्यकुमार यादवने सांगितलं.
सूर्यकुमार यादवला पहिला प्रश्न त्याच्या फलंदाजीच्या क्रमाबाबत विचारला. तेव्हा त्याने हसत सांगितलं की, पुढच्या सामन्यापासून वर खेळण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. सूर्यकुमार यादवने त्यानंतर ओमान क्रिकेट संघाचं कौतुक केलं. ‘एकूणच प्रभावी, मला वाटते की ओमानने अविश्वसनीय क्रिकेट खेळले. त्यांचे प्रशिक्षक सुलू सर (सुलक्षण कुलकर्णी) यांच्याकडून मला माहित होते की तिथे खडूसपणा असेल. ते आश्चर्यकारक होते, त्यांना फलंदाजी करताना पाहणे खरोखरच आवडले.’, असं सूर्यकुमार यादव म्हणाला.
सूर्यकुमार यादवला अर्शदीप सिंग आणि हर्षित राणाच्या गोलंदाजीबाबत विचारलं. तेव्हा सूर्यकुमार म्हणाला की, जेव्हा तुम्ही बसलेले असता आणि अचानक तुम्ही बाहेर येऊन खेळता तेव्हा ते थोडे कठीण असते.येथे खूप दमट वातावरण आहे. इतकंच काय तर हार्दिक पांड्याबाबतही सूर्यकुमार यादवने मत व्यक्त केलं. ‘ कसा बाद झाला हे दुर्दैवी आहे पण तुम्ही त्याला खेळापासून दूर ठेवू शकत नाही. त्याने चांगली गोलंदाजी केली.’ या स्पर्धेतील सुपर ४ मधील हायव्होल्टेज सामना रविवारी होत आहे. भारत पाकिस्तान पुन्हा आमनेसामने येत आहेत. याबाबत सूर्यकुमार विचारलं तेव्हा सांगितलं की, सुपर फोरसाठी सर्व काही तयार आहे.