अण्णासाहेब आवटे महाविद्यालयात वृक्षारोपण
esakal September 22, 2025 07:45 PM

मंचर, ता. २१ : येथील रयत शिक्षण संस्थेच्या अण्णासाहेब आवटे महाविद्यालयात शनिवारी (ता. २०) वृक्षारोपण करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजना विभाग व पर्यावरण जनजागृती समिती यांच्या वतीने पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त परिसरात देशी कवठाच्या झाडांची लागवड केली.
याप्रसंगी देशी आवळा, कवठ, चिंच, आंबे, जांभूळ आदी वृक्षांचे महत्त्व व गरज याविषयी प्राचार्य डॉ. नानासाहेब गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपप्राचार्य प्रा. एस.आर. सालके, व्हि.एस.कुमावत, प्रा. ए. एम. डांगे, प्रा. एम. टी. भालेकर, डॉ. एम. एच. काठे, प्रा. ए. इ. बर्डे आदी उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. एस. एस. उघडे, डॉ. एस. एस. पाटील व प्रा. रवींद्र पारधी यांनी व्यवस्था पाहिली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.