India Test Squad updates: भारतीय संघाची वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी कधी निवड होणार? BCCI सचिवांनी तारीखच सांगून टाकली
esakal September 22, 2025 07:45 PM
  • आशिया कप २०२५ नंतर भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.

  • शुभमन गिलच्या नेतृत्वात भारताने इंग्लंडविरुद्ध बरोबरी साधली होती, त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी अपेक्षा उंचावल्या आहेत.

  • या मालिकेसाठी भारतीय संघाची निवड कधी होणार, यबाबत बीसीसीआयच्या सचिवांनी माहिती दिली.

आशिया कप २०२५ स्पर्धा संपल्यानंतरही भारतीय संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये व्यस्त राहणार आहे. भारताला आशिया कप २०२५ नंतर लगेचच २ ऑक्टोबरपासून वेस्ट इंडिजविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२५-२७ स्पर्धेचाही भाग आहे.

ही मालिका शुभमन गिलसाठी कसोटी कर्णधार म्हणून मायदेशातील पहिलीच मालिका असणार आहे. त्याच्या नेतृत्वात काही दिवसांपूर्वीच भारताने इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली होती, त्यामुळे आता वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी अपेक्षा उंचावल्या आहेत.

West Indies Tour India 2025 : वेस्ट इंडिज संघ ७ वर्षांनी भारतात येणार; दिग्गज खेळाडूच्या मुलाला संधी, १५ सदस्यीय संघाची घोषणा

आता वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेला १५ दिवसांपेक्षा कमी कालावधी राहिला असल्याने भारतीय संघाची निवड कधी होणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे. आता याबाबत बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की येत्या दोन ते तीन दिवसात भारतीय संघाची निवड होईल.

बीसीसीआयच्या मुख्यलयात पत्रकारांशी बोलताना सैकिया म्हणाले, 'वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची निवड २३ किंवा २४ सप्टेंबर रोजी होऊ शकते. निवड समितीची बैठक ऑनलाईन होणार आहे.'

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात कसोटी मालिकेतील पहिला सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर २ ते ६ ऑक्टोबदरम्यान होईल. त्यानंतर १० ते १४ ऑक्टोबर दरम्यान दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर दुसरा कसोटी सामना होणार आहे. ही मालिका जिंकून भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्येही पहिल्या दोन स्थानांमध्ये आपलं स्थान भक्कम करता येऊ शकते.

श्रेयस अय्यर IN, जसप्रीत बुमराह OUT! सर्फराज खानचे पुनरागमन; वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी असा असेल संघ

दरम्यान, वेस्ट इंडिजने यापूर्वीच आपला संघ जाहीर केला आहे. त्यांनी तेजनारायण चंद्रपॉल आणि ऍलिक एथनाज यांना पुन्हा एकदा संघात संधी दिली आहे. तसेच डावखुरा फिरकीपटू खारी पिअर यालाही पहिल्यांदाच संघात निवडले आहे.

भारताविरुद्ध कसोटी मालिकेसाठी वेस्ट इंडिजचा संघ - रोस्टन चेस (कर्णधार), जोमेल वॅरिकन (उपकर्णधार), केवलॉन अँडरसन, ऍलिक एथनाज, जॉन कॅम्पबेल, तेजनारायण चंद्रपॉल, जस्टीन ग्रीव्ह्स, शाय होप, तेविन इमलाच, अल्झारी जोसेफ, शामर जोसेफ, ब्रेंडन किंग, अँडरसन फिलिप, खारी पिअर, जेडन सिल्स

FAQs

१. भारत-वेस्ट इंडिज कसोटी मालिका कधी सुरू होणार आहे?

➤ २ ऑक्टोबरपासून पहिला कसोटी सामना सुरू होईल.

(When will the India vs West Indies Test series start?)

२. भारतीय कसोटी संघाची घोषणा कधी होणार आहे?

➤ २३ किंवा २४ सप्टेंबर रोजी संघ जाहीर होण्याची शक्यता आहे.

(When will India announce the Test squad for the series?)

३. या मालिकेत भारताचा कसोटी कर्णधार कोण असेल?

➤ शुभमन गिल पहिल्यांदाच मायदेशात कसोटी कर्णधार असेल.

(Who will captain India in this Test series?)

४. कसोटी सामने कोणत्या मैदानांवर खेळले जाणार आहेत?

➤ पहिला सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर, दुसरा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर होईल.

(Where will the Test matches be played?)

५. वेस्ट इंडिजचा कर्णधार कोण असेल?

➤ रोस्टन चेस वेस्ट इंडिज संघाचे नेतृत्व करणार आहे.

(Who is the captain of the West Indies Test squad?)

६. ही मालिका कोणत्या मोठ्या स्पर्धेचा भाग आहे?

➤ ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२५-२७ चा भाग आहे.

(This Test series is part of which major tournament?)

७. वेस्ट इंडिजने कोणत्या नव्या खेळाडूला संघात संधी दिली आहे?

➤ डावखुरा फिरकीपटू खारी पिअरला पहिल्यांदाच कसोटी संघात निवडले आहे.

(Which new player has been selected in the West Indies Test squad?)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.