-किरण चव्हाण
माढा : माढा तालुक्यातील सिना नदीच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने सिना नदीवरील उंदरगाव येथील पुल दुसऱ्यावेळी पाण्याखाली गेला असून भोसरे येथील वन विभागाच्या पाझर तालवाला गळती लागली आहे. सीना नदीवरील बंधारे पाण्याखाली असून आठ दिवसांपासून चिनाकाची शेती ही पाण्याखाली गेलेली आहे.
Mpsc Success Story: 'एमपीएससी परीक्षेत अमृता ननवरे मुलींमध्ये राज्यात प्रथम'; जिद्द अन् चिकाटीच्या जाेरावर यशाला गवसणीउंदरगाव येथील पूल पाण्याखाली गेल्यामुळे माढा - वैराग - तुळजापूर ही वाहतूक ऐन नवरात्रातोत्सवात बंद आहे. त्यामुळे तुळजापूरहून ज्योत आणण्यासाठी गेलेल्या अनेक भाविकांची गैरसोय झालेली आहे. यंदाच्या पावसाळ्यात हा पुल पाण्याखाली जाण्याची दुसरी घटना आहे. मागील आठवड्यातही परंडा तालुक्यातील सिना कोळेगाव धरणातून सिना नदीत पाणी सोडल्याने पुल पाण्याखाली गेला होता.
सध्या माढा तालुक्यातील सिना नदीवरील बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत. दारफळ येथील बंधारा आठ दिवसांपासून पाण्याखाली गेलेला आहे. शेतकऱ्यांची पिके आठ दिवसापासून पाण्याखाली असल्याने ती पूर्णपणे वाया गेलेली आहेत. माढा तालुक्यात रविवारी रात्री व सोमवारी पहाटे सर्वत्र मुसळधार पाऊस झाल्यामुळे अनेक ठिकाणचे रस्ते बंद आहेत. भोसरीतील वनविभागाच्या तलावाला गळती लागलेली आहे. माढा तालुक्यात सर्वत्र अतिवृष्टी झाली आहे. बेंबळे येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे ओढे, नाले तुडुंब भरून वाहत आहेत.
Success Story:'विशाल केंजळेंची एमपीएससीमधून यशाला गवसणी'; जिद्दीच्या जाेरावर ११ वेळा सरळसेवा परीक्षेत सुयश, आई-वडिलांचे स्वप्न केलं पूर्णकुर्डुवाडी - तडवळे, भोसरे - तडवळे, कुर्डूवाडी बस स्थानकाजवळून शहरातून पंढरपूरकडे जाणारा मार्ग, कुर्डूवाडी टेंभुर्णी दोशी हॉस्पिटल जवळून जाणारा मार्ग, भोसरे - घाटणे, माढा - कुर्डुवाडी जुना रस्ता, माढा - बार्शी वडशिंगे मार्गे रस्ता, कुर्डुवाडी - भूम परांडा आवरपिंपरी येथे रस्ता बंद इत्यादी मार्ग बंद आहेत. वडशिंगे येथील ओढ्यातून सोमवारी रात्री एक ईरटीका गाडी वाहून गेली. सकाळी ग्रामस्थांच्या मदतीने ती ओढून बाहेर काढण्यात आली कोणतीही जीवितहानी झाली नाही.