ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आंदोलनातून जाणूनबुजून डावलले जात असल्याची खंत व्यक्त केली आणि भावुक झाले.
हाके यांनी सांगितले की त्यांच्यावर खोटे आरोप करून ट्रॅपमध्ये अडकवले जात आहे, त्यामुळे त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
सुप्रिया सुळे यांच्यावरही त्यांनी टीका केली, तर नवनाथ वाघमारे यांच्या गाडी जाळण्याच्या घटनेवर नाराजी व्यक्त केली.
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मराठा समाजातील मुलींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. आता हाके यांनी ओबीसी नेत्यांवरच गंभीर आरोप केला आहे. ते म्हणाले की समाजातील काही लोक मला जाणून बुजून डावलत आहेत. हे सांगत असतानाच त्यांना अश्रू अनावर झाले. ओबीसी आरक्षण वाचवायचे आहे हीच माझी प्राथमिकता आहे,असे हाके म्हणाले.
एका मुलाखती दरम्यान हाके म्हणाले की, शत्रूकडून माझ्यावर वार होत आहेत. मी थोडासा तणावात आहे. मला ट्रॅपमध्ये अडकवले जात आहे. माझ्या पाठीत खंजीर खुपसले जात आहेत. शत्रू कडून माझ्यावर वार होत आहेत. मी साधा मेंढपाळाचा मुलगा आहे. माझा कोणताही राजकीय हेतू नाही. सत्तेतील कोणत्याही मंत्र्यांच्या प्रभावाखाली येणारा नाही. मला प्रचंड त्रास झाला आहे. माझे दोन फोन बंद करावे लागले. माझ्या पत्नीच्या मोबाईल वर कॉल येतात. हे लोक आधी गोड बोलतात आणि मग अडकवतात.
Vijay Wadettiwar: ओबीसी उपसमिती हे सरकारचे सोंग; विजय वडेट्टीवार, समाजाला लॉलीपॉप देण्याचा शासनाचा प्रयत्नबीडमधील सभेबाबत बोलताना ते म्हणाले की, बीड मध्ये यापूर्वी अनेक सभा झाल्या आहेत. बीड मध्ये ओ बी सी यांच्या भावनांना मी वाट करून दिली आहे. मी एक आंदोलक आहे मला कोणाचा अजेंडा राबवला नाही. कुठल्या ही नेत्याबद्दल मला बोलायचं नाही. नवनाथ वाघमारे यांची गाडी जाळण्यात आली यावरही लक्ष्मण हाके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ते आक्रमक भूमिका मांडतात आणि हेच समाज कंटक यांना बघवले नाही.
सुप्रिया सुळे यांच्याबाबत बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले की, त्या जन्मजात सोन्याचा चमचा घेऊन आल्या आहेत त्यांना काय समजणार आहे, त्यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार का दिला ये दिसून येते. गोपीचंद पडळकर यांच्याबाबत बोलताना हाके म्हणाले की, मनोज जरांगे पातळी सोडून बोलत होते तेव्हा कुणीही भूमिका घेतली नाही. पडकळकर यांच्यावर बोलणाऱ्यांनी आधी स्वत:च्या घराकडे बोलावे. असे हाके म्हणाले
FAQsप्रश्न 1: लक्ष्मण हाके यांनी नेमकी कोणती खंत व्यक्त केली?
➡️ त्यांनी सांगितले की ओबीसी आरक्षण आंदोलनात त्यांना जाणूनबुजून डावलले जात आहे.
प्रश्न 2: हाके यांनी कोणते वैयक्तिक अडचणी सांगितल्या?
➡️ त्यांना खोट्या ट्रॅपमध्ये अडकवले जात असल्याचे, फोन बंद करावे लागले आणि पत्नीला धमकीचे कॉल येतात असे त्यांनी सांगितले.
प्रश्न 3: त्यांनी कोणत्या नेत्यांवर टीका केली?
➡️ त्यांनी सुप्रिया सुळे आणि गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका केली.
प्रश्न 4: नवनाथ वाघमारे यांच्या घटनेवर हाके काय म्हणाले?
(
➡️ ते आक्रमक भूमिका मांडतात, म्हणूनच समाजकंटकांनी त्यांची गाडी जाळली, असे हाके म्हणाले.