अक्षय बडवे, पुणे प्रतिनिधी
Maharashtra Farmers to Get Compensation Before Diwali, Assures Agriculture Minister : पावसामुळे नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधी सरकारकडून आर्थिक मदत मिळणार आहे. राज्याचे कृषीमंत्री दत्ता भरणे यांनी याबाबत माहिती दिली आहे. नुकसान झालेल्या भागात सध्या वेगात पंचनामे केले जात आहेत. ज्याचे ज्याचे नुकसान झाले आहेत, शेती पिकाचे असो किंवा मातीचे नुकसान सगळ्यांना सरकार भरपाई देणार असल्याचे कृषीमंत्र्यांनी सांगितले. ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत काही निकष आहेत त्याबद्दल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील, असेही ते म्हणाले.
पावसाने झोडपल्यामुळे उभी पिके पाण्यात गेली. हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला. शेतामधील स्थिती पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले. मराठवाड्यात याचा सर्वाधिक फटका बसला होता. बीड, संभाजीनगर, जालना, परभणी अन् नांदेडमध्ये पावसाने हाहाकार माजवला होता. त्याशिवाय सोलापूर, पुण्यामध्येही पावसाने रौद्र रूप घेतलं होतं. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. दिवाळीआधीच शेतकऱ्यांचे तोंड कडू झालेले. ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणीही वारंवार केली जात आहे. आता सरकारने मोठं पाऊल उचलले असून दिवाळीच्या आधी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील, अशी माहिती महाराष्ट्राचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. ते पुण्यामध्ये बोलत होते.
Maharashtra Rain Alert : मेघगर्जनेसह पाऊस धुमाकूळ घालणार, पुढील ४ दिवस राज्यात कोसळधार, पाहा कोणत्या जिल्ह्यांना दिला अलर्टमे २०२५ पासून सप्टेंबर पर्यंत मोठ्या प्रमाणावर पाऊस आहे. निसर्गाचे संकट आले आहे, त्याला आपल्याला सामोरे जावे लागणार आहे. शेती पिकाचे नुकसान वाढत आहे. ६०,६५ हजार हेक्टर वरून ते अजून वाढत चाललं आहे. हवामान बदलाचा विषय आहे, सरारीपेक्षा एकाच दिवशी मोठा पाऊस पडतोय, त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होतं आहे. पण त्याववर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे लक्ष आहे. सर्व ठिकाणाच्या शेतीच्याबाबतचे पंचनामे सुरू आहेत, असे भरणे म्हणाले.
पुण्यात मोठी खळबळ! राष्ट्रवादीच्या नेत्याच्या बॅगेत रिव्हॉल्वर अन् पाच जिवंत काडतुसे, पुणे विमानतळावर गुन्हा