गोपी बहु पुन्हा प्रेग्नेंट? बेबी बंपसोबत शेअर केले फोटो, काही महिन्यापूर्वीच झालेलं बाळ
esakal September 23, 2025 01:45 AM

Devoleena Bhattacharjee: 'साथ निभाना साथिया या मालिकेतून घराघरात पोहचलेली गोपी बहू म्हणजेच देवोलिना भट्टाचार्जी पुन्हा चर्चेत आली आहे. ९ महिन्यापूर्वी तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला होता. त्यानंतर आता तिने पुन्हा तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने एका हातात दिवा तर दुसरा हात पोटावर ठेवत फोटो काढलाय. या फोटोमध्ये तिचं बेबी बंप सुद्धा दिसत आहे. त्यामुळे देवोलिना पुन्हा प्रेग्नेट आहे का? अशा चर्चा रंगताना पहायला मिळतय.

देवोलिनाने कसे फोटो पोस्ट केले?

देवोलिना भट्टाचार्जी हिने नवरात्रीनिमित्त घटस्थापनेच्या दिवशी साडी नेसून हे फोटो पोस्ट केले आहेत. तिने यावेळी बंगाली लूक केलेलं पहायला मिळतय. यावेळी कपाळावर लाल कुंकू, मोकळे केस आणि हातात दिवा असा लूक गोपी बहुचा पहायला मिळतोय. यावेळी देवोलिनाने सोन्याचे दागिने सुद्धा घातलेले आहे. यावेळी तिचा एक हात पोटावर ठेवलेला आहे. त्यात तिचं बेबी बंप दिसत आहे.

फोटोला काय कॅप्शन दिलं?

दरम्यान देवोलिनाने फोटोला कॅप्शन देत म्हटलय की, 'माता दुर्गाचं धरतीवर आगमन झालय. सर्वांच्या आयुष्यात सकारात्मकता, शक्ती, आनंद, येवो हीच प्रार्थना. शुभ महालया!' असं तिने तिच्या पोस्ट मध्ये म्हटलय. सध्या तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Devoleena Bhattacharjee (@devoleena)

देवोलिना खरंच प्रेग्नेंट?

परंतु देवोलिनाने याआधी सुद्धा हे फोटो पोस्ट केले होते. जेव्हा देवोलिनाला बाळ झालं होतं, त्यावेळी तिने याच लूकमध्ये असेच फोटो पोस्ट केले होते. त्यामुळे तिने हे खास नवरात्रीसाठी पोस्ट केले असण्याची शक्यता आहे. परंतु सध्या सोशल मीडियावर तिच्या प्रेग्नेंसीची चर्चा होताना पहायला मिळतेय.

आई...गोंधळाला ये! गौतमी पाटीलचं नवरात्र स्पेशल गाणं प्रदर्शित, सोशल मीडियावर डान्सची चर्चा
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.