नितीन बिनेकर
मुंबई : ‘लोकल वेळेवर येत नाही? ऑफिसमध्ये लेटमार्क लागतो? काळजी करू नका! १,६०० रुपयांची पूजा केली, तर लोकल वेळेवर धावेल,’ असा धक्कादायक दावा, मुंबईच्या जीवनवाहिनी असलेल्या लोकलचे डबे जाहिरातींनी व्यापलेल्या बंगाली बाबांनी केला आहे. रेल्वेला आजपर्यंत जे शक्य झाले नाही त्यावर तोड सांगण्याची हिंमत या भोंदूबाबांनी केली आहे. ‘सकाळ’ने केलेल्या तपासणीत हा दावा करण्यात आला आहे.
मुंबईच्या लोकलमध्ये गर्दी, दररोजची धावपळ, जागेसाठीचा संघर्षात प्रवाशांच्या वाट्याला अजून एक नवीन संकट डोकावू लागले आहे. लोकलचे डबे भोंदूबाबांच्या जाहिरातींनी अक्षरशः व्यापले आहेत. ‘लग्न जमत नाही का? नोकरी लागत नाही का? प्रेमभंग झाला का?’ अशा सर्व अडचणींवर तत्काळ तोडगा देण्याचे आश्वासन भोंदूबाबा देतात. महत्त्वाचे म्हणजे दररोजच्या प्रवासाने निराश झालेले असंख्य मुंबईकर बंगाली बाबांच्या सापळ्यात फसत आहेत.
Navi Mumbai: अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई! कोपरखैरणे, वाशी परिसरातील इमारती जमीनदोस्त‘सकाळ’च्या प्रतिनिधीने अशाच एका जाहिरातीतील नंबरवर संपर्क साधला. तेव्हा संबंधिताशी झालेला संवाद...
प्रतिनिधी - बाबा, लोकल उशिरा येते, ऑफिसला वेळेवर पोहोचता येत नाही, काही तरी उपाय सांगा.
भोंदूबाबा - तुम्ही तुमचा फोटो, नाव आणि जन्मतारीख व्हॉट्सॲपवर पाठवा.
(ही माहिती पाठवल्यानंतर)
भोंदूबाबा - काही प्रॉब्लेम नाही, बेटा. सर्व ठीक होईल, तुम्ही जे काम करता, त्यात अपयश मिळते. तुम्ही मेहनत करता; मात्र त्यात यश मिळत नाही.
प्रतिनिधी - काय करावे लागेल बाबा? रेल्वे उशिरा धावते? पूजा करा, वेळेवर येईल!
भोंदूबाबा - पैसै खर्च करावे लागतील. करणार का? प्रतिनिधी - किती पैसै लागणार?
भोंदूबाबा - पूजा बांधावी लागेल. १,६०० रुपये लागतील.
प्रतिनिधी - बाबा, थोडे पैसै कमी होणार नाही का?
भोंदूबाबा - माझ्या भक्तांना मी निराश करीत नाही. १,२०० रुपये लागतील, त्यापेक्षा कमी होणार नाहीत.
भोंदूबाबा - तूमची पूजा लावू का++ मग?
जगातील कोणत्या देशात पहिल्यांदाच ईव्हीएम वापरून निवडणुका घेण्यात आल्या?प्रतिनिधी - बाबा, ठीक आहे, मला यावे लागेल का, मुंबईत कुठे येऊ?
भोंदूबाबा - मी अजमेरला बसलोय. तुम्हाला पूजेला येण्याची गरज नाही. तुमच्या नावाची पूजा मी बांधतो.
प्रतिनिधी - पूजा झाली, हे मला कसे कळणार?
भोंदूबाबा - बेटा, मी पूजेच्या साहित्याच्या दुकानदाराचा क्यूआर कोड पाठवतो. १,२०० रुपये टाका.
प्रतिनिधी - पूजेचा फोटो पाठवाल का?
भोंदूबाबा - आम्ही फोटो पाठवणार नाही.
प्रतिनिधी - मला कसे कळणार?
भोंदूबाबा - २४ तासांत तुमच्या सर्व बाधा दूर होतील. लोकल बरोबर येईल, त्या वेळी समजून जायचे की, आम्ही पूजा केली आहे. मी क्यूआर कोड पाठवला, किती वेळेत पैसै पाठवणार आहात, ते सांगा.