3 Best Yoga Asanas by Swami Ramdev : लठ्ठपणा, अपचन आणि गॅसेसची समस्सया वाढली की पोटाचे अनेक त्रास सतावतात. जड अन्नपदार्थ खाल्ल्याने किंवा नीट, वेळेवर न जेवल्याने , या सवयींमुळे गॅसेस, बद्धकोष्ठता, अपचन यासारख्या समस्या जाणवू लागतात. बरेच लोक पहिल्यांदा या समस्यांकडे खूल लक्ष देत नाहीत, हलक्यात घेतात, पण हळूहळू याच समस्यांचे मोठ्या आजारात रुपांतर होऊ शकते.
आपलं पोट जेव्हा खराब असते तेव्हा थकवा, चिडचिड आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते. पण फक्त औषधोपचार हा त्यावरचा उपाय नाही; तर योग आणि योग्य आहार हे देखील दीर्घकाळ निरोगी पोट राखण्यास मदत करू शकतात. स्वामी रामदेव यांनी काही सोप्या योगासनांची माहिती दिली आहे, ती केल्याने बद्धकोष्ठता, वेदना किंवा अपचन यासारख्या पोटाच्या समस्यांमधून आरा मिळू शकतो, ती फायदेशीर ठरतात. या आसनांचा नियमित सराव केल्याने पोटाचे आजार कमी होतात आणि पचनसंस्था सुधारते.
या योगासनांबद्दल आणि ते कसे करायचे ते जाणून घेऊया.
1) मंडूकासन-
मंडूकासन हे एक असे आसन आहे ज्यामध्ये तुम्ही गुडघ्यांवर बसून, तुमचे पाय मागे वाकवायचे असतात. त्यानंतर पुढे वाकून पाय हातांनी धरावे लागतात. आणि पुढे वाकून तुमचे पाय हातांनी धरावे .
फायदे –
पोटावर हलका दाब पडतो,
पोटाच्या अवयवांना मालिश होते,
पोटाची सूज कमी होते,
अपचनाची समस्या कमी होते.
अन् लवकर पचतं.
बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो.
2) पवनमुक्तासन –
या आसनामध्ये जमीनीच्या दिशेने पाठ टेकून झापोवे, त्यानंतर दोन्ही गुडघे पोटाजवळ खेचून घेऊन पकडावे. या स्थितीत थोडा वेळ तसेच रहावे. यामुळे गॅस बाहेर पडतो आणि पोटाची सूज कमी होते.
फायदे –
गॅस आणि वेदनांपासून आराम
पोटदुखी कमी होते.
वायूच्या समस्या कमी होतात.
पोटात फुगणे कमी होते.
मुले आणि वृद्ध दोघेही वापरू शकतात.
3) भुजंगासन –
या आसनात पोटावर झोपावं आणि त्यानंतर सापासारखे उठणं समाविष्ट आहे. याला कोब्रा पोज असेही म्हणतात. पोटाच्या आजारांमुळे अनेकदा कंबर आणि मणक्याचा ताण वाढतो. पण या आसनामुळे न हा ताण कमी होण्यास मदत करते.
फायदे –
पोट, कंबर आणि मणक्यासाठी फायदेशीर.
पोटाच्या स्नायूंना ताण येतो.
रक्ताभिसरण सुधारते.
पचन सुधारते.
जर तुम्हाला पोटदुखी किंवा पाठदुखी असेल तर ही आसने हळूहळू करा.
योगासनं तुमच्या दैनंदिन दिनचर्येत समाविष्ट करा.
दररोज सकाळी रिकाम्या पोटी या योगासनांचा सराव करण्याची शिफारस स्वामी रामदेव करतात. त्यासाठी हळूहळू सुरुवात करावी, शरीराच्या मर्यादा जाणून घ्याव्यात आणि जास्त श्रम टाळावे. हलके, सहज पचणारे अन्न खा आणि भरपूर पाणी प्यावे, असाही सल्ला देण्यात आला आहे.