अंबरनाथ : अंमली पदार्थ वाहतूक व विक्रीस बंदी असताना देखील सर्रासपणे वाहतूक आणि विक्री होत असल्याचे दिसून येत आहे. या विरोधात कारवाई होऊन देखील हे प्रकार थांबलेले नाहीत. दरम्यान अंबरनाथमध्ये पोलिसांनी अंमली पदार्थ विक्री विरोधात मोठी कारवाई करत तब्बल अडीच लाख रुपयांचा साठा जप्त केला असून दोन जणांना बेड्या ठोकल्या आहेत. यात एका महिलेचा देखील समावेश आहे.
अंबरनाथ पश्चिमेच्या भगतसिंग नगरमध्ये पोलिसांनी सदरची कारवाई केली आहे. भगतसिंग नगरमध्ये अंमली पदार्थांची विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार अंबरनाथ पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाचे एपीआय अविनाश गायकवाड यांनी पथकासह धाड टाकत तपासणी केली. या प्रकरणात शरीफ सलीम शेख आणि त्याची पत्नी आसिया शरीफ शेख या दोघांना बेड्या ठोकल्या.
Satara : फॉलोवर्स वाढविण्यासाठी सोशल मीडियावर अनोखी जाहिरात; महिलांची दुकानात गर्दी, दुकान मालकावर गुन्हा दाखलअडीच लाखांचा मुद्देमाल हस्तगत
पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून १ लाख ६० हजार रुपये किमतीचं एमडी ड्रग, ८० हजार रुपयांचे हेरॉईन, ३३४ बॉटल थीनर सोल्युशन आणि कप सिरपच्या बाटल्या असा अंमली पदार्थांचा मोठा साठा जप्त करण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे मागील काही दिवसात शरीफ शेख याच्यावर झालेली ही तिसरी कारवाई असून तो जामीनावर सुटून आल्यानंतर पुन्हा ड्रग विक्रीत सक्रिय होत असल्याचं समोर आलं आहे.
Jalna Rain : जालना जिल्ह्यात पावसाचा कहर; अतिवृष्टीचा २ लाख ४७ हजार हेक्टरवरील पिकांना फटकाआरोपीवर २१ वा गुन्हा दाखल
तर शरीफ शेख त्याच्यावर यापूर्वीचे तब्बल २० गुन्हे दाखल असून सध्या दाखल झालेला २१ वा गुन्हा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. नुकताच जामिनावर सुटल्यानंतर त्याने अंमली पदार्थ विक्री करण्यास सुरवात केली होती. दरम्यान आता त्याच्यावर कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचं एसीपी शैलेश काळे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांनी सांगितलं आहे.