swt227.jpg
93210
मुंबईः बॅ. खर्डेकर महाविद्यालयाच्या स्टाफचा विशाल परब यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
खर्डेकर महाविद्यालय कर्मचाऱ्यांचा सत्कार
वेंगुर्लेः बॅ. खर्डेकर महाविद्यालयाने भविष्यातही यशाची हीच परंपरा कायम राखावी. महाविद्यालयाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू. यामहाविद्यालयाची ओळख जागतिक स्तरावर नेण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही भाजपचे युवा नेते उद्योजक विशाल परब यांनी केले. येथील बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाला शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल मुंबई विद्यापीठाचा सर्वोत्तम ग्रामीण महाविद्यालय पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत परब यांनी या सन्मानाबद्दल महाविद्यालयाच्या स्टाफचा सत्कार केला. बॅ. खर्डेकर महाविद्यालयात हा सोहळा पार पडला. यावेळी ज्येष्ठ नेते ॲड. अनिल निरवडेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.बी. गोस्वामी, संस्था प्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण, पर्यवेक्षक डी.जे. शितोळे, स्टाफ सेक्रेटरी प्रा. विवेक चव्हाण, कार्यालय अधीक्षक संभाजी पाटील, आयक्यूओसी को-ऑर्डिनेटर एस.एच. माने, जिमखाना चेअरमन वीरेंद्र देसाई यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
..................
swt228.jpg
93211
नांदगाव ः सरस्वती हायस्कूल येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधताना जगदीश कातकर सोबत. सुधीर तांबे, सुदर्शन अलकुटे, श्रीकांत सावंत आदी.
नांदगावात हायस्कूलमध्ये दाखले वाटप
नांदगावः सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या संकल्पनेतून ‘शाळा तेथे दाखला’ मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा आढावा कणकवली तालुक्यातील विविध शाळांना भेटी देत प्रातांधिकारी जगदीश कातकर यानी घेतला. या भेटीवेळी सरस्वती हायस्कूल नांदगाव येथे भेट देत मुलांशी संवाद साधून मार्गदर्शन केले. यावेळी मुख्याध्यापक सुधीर तांबे, नांदगाव तलाठी सुदर्शन अलकुटे, शिक्षक श्रीकांत सावंत यांच्यासह अधिकारी व शिक्षक उपस्थित होते. या विशेष मोहिमेअंतर्गत विद्यार्थ्यांना वय अधिवास प्रमाणपत्र व जातीचे दाखले उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील सर्वच शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यात उत्स्फूर्तपणे सहभागी होत असून पालकही सहकार्य करीत आहेत.