उत्तर प्रदेशातील अलीगढ येथील महर्षी वाल्मिकी महोत्सवात सहभागी झालेले बॉलिवूड अभिनेता हेमंत बिर्जे यांच्यावर आयोजकांनी गंभीर आरोप केले आहेत. पैसे मिळाल्यानंतरही हेमंत बिर्जे कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत, असा आरोप आहे. आयोजक जेव्हा त्यांना बोलावण्यासाठी त्यांच्या हॉटेलच्या खोलीत गेले तेव्हा ते दारूच्या नशेत होते. त्यांनी अश्लील वर्तन केले. महोत्सव समितीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नेहमीप्रमाणे महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त अलिगडमध्ये महर्षी वाल्मिकी महोत्सव समितीने भव्य मेळावा आयोजित केला होता. वाल्मिकी समुदायाच्या सांस्कृतिक वारशाला आणि एकतेला चालना देण्यासाठी या कार्यक्रमाचे उद्दिष्ट होते. १९८५ च्या 'द अॅडव्हेंचर्स ऑफ टार्झन' या चित्रपटात काम करणारे अभिनेते हेमंत बिर्जे यांना विशेष आकर्षण म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. हेमंत बिर्जे यांनी हिंदी, मल्याळम आणि तेलगू चित्रपटांमध्ये काम केले आहे. २० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
अभिनेता उमेश कामतचा ‘ताठ कणा’ लवकरच मोठ्या पडद्यावर; साकारतोय 'ध्येयवेड्या डॉक्टरची भूमिकाहेमंत बिर्जेने या कार्यक्रमासाठी ₹९०,००० शुल्क निश्चित केले होते. जे आयोजकांनी आगाऊ भरले होते. शिवाय, आयोजकांनी मुंबई ते दिल्ली आणि नंतर अलीगढ पर्यंतच्या त्यांच्या प्रवास आणि हॉटेल खर्चाची संपूर्ण व्यवस्था केली होती. शनिवारी बिर्जे यांची पहिली फ्लाइट चुकवल्यामुळे आयोजकांना दुसरी फ्लाइट बुक करण्यासाठी अतिरिक्त ₹२५,००० खर्च करावे लागले. रविवारी संध्याकाळी ६:३० च्या सुमारास ते तीन साथीदारांसह अलीगढ येथे पोहोचले. मीनाक्षी पुलाजवळील एका हॉटेलमध्ये राहिले.
त्यांचा कार्यक्रम रात्री ८:३० वाजता होणार होता. पण ते हॉटेलमधून बाहेर पडले नाहीत. आयोजकांनी त्यांच्याशी अनेक वेळा फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. आयोजकआणि भाजप नेते संदेश राज यांच्यासह समितीचे सदस्य हॉटेलमध्ये आले तेव्हा त्यांना अभिनेता दारूच्या नशेत आढळला. हेमंत बिर्जे हे गोंधळून जात होते. आयोजकांना शिवीगाळ करत होते.
आयोजकांनी त्याला ताबडतोब कार्यक्रमस्थळी परत येण्यास किंवा त्याचे पैसे परत करण्यास सांगितले. परंतु त्यांनी नकार दिला. परिस्थिती इतकी बिकट झाली की, हॉटेलमध्ये गोंधळ उडाला. पोलिसांना पाचारण करावे लागले. सिव्हिल लाइन्स पोलीस स्टेशनचे प्रभारी पंकज मिश्रा यांची टीम घटनास्थळी पोहोचली. अभिनेत्याला पोलीस ठाण्यात घेऊन गेली.
दोन्ही पक्षांमध्ये रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात वाटाघाटी सुरू होत्या. सुरुवातीला बिर्जे यांनी ५०,००० रुपये परत करण्यास सहमती दर्शवली. परंतु आयोजकांनी पूर्ण रक्कम आणि प्रवास खर्चाची परतफेड करण्याची मागणी केली. जेव्हा तोडगा निघाला नाही, तेव्हा आयोजकांनी बिर्जेविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ४२०, ५०४ आणि ५०६ अंतर्गत तक्रार दाखल केली. ज्यामध्ये त्यांच्यावर मद्यपान करून अनादर, धमकी आणि फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला. सीओ तिसरा सर्वम सिंग यांनी बिर्जे दारू पिऊन होते याची पुष्टी केली. त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले.
अय्यो! एवढ्या मोठ्या चित्रपटात अशी चूक? 'कांतारा चॅप्टर १' मध्ये ती गोष्ट पाहून नेटकऱ्यांनी लावला डोक्याला हातअहवालात दारू प्यायल्याचे पुष्टीकरण झाले. पोलिसांनी अभिनेता आणि त्याच्या साथीदारांना रिमांडवर ठेवले आहे. त्यांची चौकशी सुरू आहे. आयोजक संदेश राज म्हणाले, "आम्ही त्यांना योग्य आदर आणि व्यवस्थेने आमंत्रित केले होते. परंतु त्यांच्या वागण्याने समुदायाचा अपमान झाला आहे. आम्ही माफी मागण्याची आणि पूर्ण परतफेड करण्याची मागणी करत आहोत. हेमंत बिर्जे यांनी अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी केलेले नाही. स्थानिक सूत्रांचे म्हणणे आहे की, त्यांनी प्रवासाच्या थकव्याचा हवाला दिला. परंतु नशेच्या आरोपांना पूर्णपणे नाकारले नाही.