Dhanatrayodashi 2025 Good Luck Tips : आज 18 ऑक्टोबर..धनत्रयोदशीचा शुभ सण साजरा होत आहे. हा दिवस दिवाळीच्या उत्सवाची सुरुवात मानला जातो आणि धन्वंतरी त्रयोदशी म्हणूनही ओळखला जातो. समुद्रमंथनातून देवी लक्ष्मी आणि भगवान धन्वंतरी अवतरले, त्यामुळे या दिवशी लक्ष्मी-कुबेराची पूजा आणि नवीन भांडी, झाडू, गणपती-लक्ष्मीच्या मूर्ती खरेदी करणे शुभ समजले जाते. पण सावध राहा कारण काही चुका केल्यास सणाचा आनंद कालांतराने दुःखात बदलू शकतो. चला जाणून घेऊया या दिवशी कोणत्या चुका टाळायच्या.
दरवाजा बंद ठेवू नका
रात्री देवी लक्ष्मी सौभाग्य घेऊन येतात, त्यामुळे संध्याकाळी दरवाजा बंद करू नका. उघडा दरवाजा सुख-संपत्तीचे स्वागत करतो तर बंद दरवाजा आशीर्वादाला अडथळा ठरतो.
दान शुभ आहे, पण संध्याकाळी मीठ किंवा साखर दान करणे अशुभ मानले जाते. यामुळे लक्ष्मी नाराज होऊन घराबाहेर पडते आणि राहूचा प्रभाव वाढून आर्थिक अस्थिरता येऊ शकते.
लक्ष्मी-कुबेराच्या पूजेच्या दिवशी पैसे उधार देणे टाळा. असे केल्याने आर्थिक नुकसान होऊ शकते, कारण घरातून संपत्तीची ऊर्जा कमी होते.
धन्वंतरी अमृताच्या भांड्यासह आले त्यामुळे भांडी खरेदी शुभ आहे. पण रिकामी भांडी घरात गरिबी आणतात. खरेदी करताना त्यात पाणी, गूळ किंवा तांदूळ टाकून आणा जेणेकरून संपत्ती टिकेल.
धनत्रयोदशी हा आनंदाचा सुखाचा सण आहे, पण त्यात सुद्धा सावधगिरी बाळगा. या टिप्स फॉलो करून तुमच्या घरात सकारात्मकता आणि समृद्धी आमंत्रित करा. शुभ धनत्रयोदशी.. शुभ दीपावली..! जास्त माहिती हवी असेल तर साठी स्थानिक पुजारी किंवा ज्योतिष्यांचा सल्ला घ्या.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.