Latest Marathi News Live Update : जमीन व्यवहारात माझा संंबंध नाही, प्रतिज्ञापत्रात सगळं सांगितलंय- मुरलीधर मोहोळ
esakal October 19, 2025 04:45 PM
Murlidhar Mohol Live : जमीन व्यवहारात माझा संंबंध नाही, प्रतिज्ञापत्रात सगळं सांगितलंय- मुरलीधर मोहोळ

पुण्यातील एका ट्रस्टची जमीन हडपल्याच्या आरोपावर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना स्पष्टिकरण दिले आहे. मी या एलएलपी कंपनीतून २०२४ मध्येच बाहेर पडलो आहे. आरोप करण्याआधी राजू शेट्टी यांनी माझ्याशी बोलायला हवं होते असे मोहोळ म्हणाले.

Mumbai Live : मनसेच्या गोरेगावमधील मेळाव्याला थोड्याच वेळात सुरुवात

राज ठाकरे आज मुंबईतील गटाध्यक्षांना मार्गदर्शन करणार आहेत यासाठी गोरेगावमध्ये मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

Nagpur Live : नांदेड-नागपूर महामार्गावर भीषण तिहेरी अपघात; दोन ठार, आठ जखमी

नांदेडच्या हदगाव तालुक्यातील भानेगाव फाट्याजवळ आज सकाळी झालेल्या विचित्र तिहेरी अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत. हा अपघात जेसीबी, आयशर आणि कार यांच्यात झाला. लातूरहून देवगुरे कुटुंब चंद्रपूरला मुलगी पाहण्यासाठी जात असताना ही दुर्घटना घडली. अपघातात सॉफ्टवेअर अभियंता आणि एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर आठ जणांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Nashik Live : मालेगावमध्ये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ४७ कोटींचे अनुदान; दादा भुसे यांचा तीन दिवसांत वितरणाचा आदेश

मालेगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान तातडीने वितरीत करण्याचे आदेश शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिले आहेत. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या पंचनाम्यानुसार, ५४ हजार हेक्टर क्षेत्रातील ८६ हजार लाभार्थ्यांसाठी ४७ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले असून, पुढील तीन दिवसांत हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या सूचना महसूल प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

Pandharpur News : पंढरपुरात ३० लाखांची सुगंधी तंबाखू जप्त

पंढरपुरात ऐन दिवाळीत पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी मोहिम सुरू केली आहे. या दरम्यान मोठी कारवाई केली आहे. तब्बल 14 लाख रूपये किंमतीची सुगंधी तंबाखू जप्त करण्यात आली आहे. एका टेम्पो मधून 30 पोती सुगंधी तंबाखू नेली जात होती. पोलिसांना याची माहिती मिळताच छापा टाकून कारवाई केली. अन्न व औषध नियमाप्रमाणे पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nashik News Updates : नाशिक रोडजवळ कर्मभूमी एक्सप्रेसमधून तिघे खाली पडले, दोघांचा मृत्यू

नाशिक रोडजवळ कर्मभूमी एक्सप्रेसमधून तिघे खाली पडल्याची घटना घडलीय. यात दोघांचा मृत्यू झाला असून एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. जखमीवर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

Weather Updates : मराठवाड्यात ढगाळ वातावरण, दिवाळीत तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता

दिवाळीत येत्या चार ते पाच दिवसात राज्यातलं हवामान संमिश्र राहण्याची शक्यता आहे. काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. सर्वत्र पाऊस नसला तरी मराठवाड्यात ढगाळ वातावरणाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Kolhapur News Updates : धनत्रयोदशीनिमित्त अंबाबाईची धन्वंतरी रुपात अलंकारिक पूजा

धनत्रयोदशी निमित्त करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची श्री धन्वंतरी रूपात अलंकारिक पूजा बांधण्यात आली होती. दीपावलीतील महत्त्वाचा दिवस म्हणजे धनत्रयोदशी. धनत्रयोदशी निमित्त करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची श्री धन्वंतरी रूपात अलंकारिक पूजा बांधण्यात आली. ही पुजा आशुतोष कुलकर्णी, सचिन गोटखिंडीकर ,श्रीनिवास जोशी यांनी बांधली. धन्वंतरी रूपातील अंबाबाई देवीची ही पूजा पाहण्यासाठी भाविकांनी मंदिरात मोठी गर्दी केली होती.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.