Famous Actor Missing : 'मुन्ना भाई एमबीबीएस'मधील लोकप्रिय अभिनेता बेपत्ता; गर्लफ्रेंडसोबत होती भांडणं, नेमकं प्रकरण काय?
Saam TV October 19, 2025 04:45 PM

लोकप्रिय अभिनेता बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे.

अभिनेत्याने संजय दत्त सोबत 'मुन्ना भाई एमबीबीएस'मध्ये काम केले होते.

अभिनेत्याच्या गर्लफ्रेंडने त्याच्यावर गंभीर आरोप केले होते.

मनोरंजनसृष्टीतून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. 'मुन्नाभाई एमबीबीएस'मधील (Munna Bhai M.B.B.S.) लोकप्रिय अभिनेता तब्बल 10 वर्षांपासून बेपत्ता आहे. याचे नाव विशाल ठक्कर असे आहे. त्याचे कुटुंबीय त्याच्या परत येण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.वैयक्तिक आयुष्यातील अडचणींमुळे त्यांच्या आयुष्यात नैराश्य आले. विशाल त्याच्या गर्लफ्रेंडसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होता.

मीडिया रिपोर्टनुसार, विशाल (Vishal Thakkar) आणि त्याच्या गर्लफ्रेंडमध्ये सतत भांडणे होत होती. त्याची गर्लफ्रेंडमध्ये खूपच रागीट स्वभावाची होती. त्यांच्यातील वादामुळे गर्लफ्रेंडनेविशाल विरुद्ध पोलीस स्टेशनला तक्रार केली. त्यामुळे विशालला अटक देखील झाली होती. मात्र नंतर तक्रार मागे घेण्यात आली. पण तो हा धक्का सहन करू शकला नाही. यामुळे तो नैराश्यात गेला.

विशाल ठक्करवर 2015मध्ये बलात्काराचा आरोपही करण्यात आला. त्यानंतर डिसेंबर 2015 मध्ये तो न्यू इयर सेलिब्रेशनसाठी मित्रांसोबत बाहेर पडला. आईकडून 500 रुपये घेऊन तो निघून गेला. दुसऱ्या दिवशी शूटिंगसाठी जाण्यासाठी मुंबईच्याघोडबंदर भागात रिक्षात बसताना दिसला. त्यानंतर विशाल ठक्कर गायब झाला तो अद्याप परतला नाही. त्याच्या घरातल्या सदस्यांनी पोलीस स्टेशनला बेपत्ताअसल्याची तक्रार दाखल केली. घरातील लोकांना गर्लफ्रेंडवर संशय होता. मात्र कोणताही पुरावा नसल्यामुळे तिच्यावर कारवाई झाली नाही. मात्र दोन वर्षानंतर तिचा देखील मृत्यू झाला. मात्र अद्याप या प्रकरणात कोणतीही ठोस माहिती मिळाली नाही.

Raghav Juyal : आर्यन खानच्या चित्रपटाने राघव जुयाल झाला मालामाल, ५ मजली आलिशान बंगला बांधतोय वर्कफ्रंट

विशाल ठक्करने 2001 मध्ये रिलीज झालेल्या 'चांदनी बार'मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्याला 'मुन्नाभाई एमबीबीएस' चित्रपटामुळे खूप लोकप्रियता मिळाली. हा चित्रपट 2003 मध्ये रिलीज झाला. या चित्रपटात विशाल ठक्करने बॉलिवूड अभिनेता संजय दत्तसोबत काम केले आहे. तसेच तो 'किस देश में है मेरा दिल', 'क्योंकि सास भी कभी बहू थी' या लोकप्रिय कार्यक्रमात काम केले आहे.

Shah Rukh Khan : शाहरुख खानच्या 'मन्नत'मध्ये होणार नाही दिवाळी पार्टी, नेमकं कारण काय?
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.