मोलकरणीसोबत शारीरिक संबंध अन्.. पत्नीनं पुस्तकातून बॉलिवूड अभिनेत्याबद्दल केले धक्कादायक खुलासे
Saam TV October 19, 2025 04:45 PM

बॉलीवूड इंडस्ट्रीतील एक स्टार आता हयात नाही, पण त्यांच्या उत्कृष्ट अभिनयाची अनेकदा चर्चा होते. वयाच्या ६७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. परंतु, ते अजूनही आपल्या चाहत्यांमध्ये अमर आहेत. दरम्यान, प्रसिद्ध अभिनेत्याशी संबंधित एका खुलाशामुळे बराच वाद निर्माण झाला होता. ओम पुरीच्या संबंधित मोठा दावा अभिनेत्याच्या पत्नीनेच केला होता. या दाव्यामुळे सिनेसृष्टीत खळबळ उडाली होती.

बॉलिवूड लाइफच्या वृत्तानुसार, ओम पूरी यांच्या पत्नी नंदिता पुरी यांनी २००९ मध्ये अनलाइकली हिरो ओम पूरी, या पुस्तकात एक धक्कादायक खुलासा केला होता. या खुलाशानंतर ओम पूरी आणि नंदिता पूरी यांचा घटस्फोट झाल्याचे म्हटले जात आहे.

२१ दिवस गव्हाची चपाती नाही खाल्ली तर? शरीरात दिसतील आश्चर्यकारक बदल, तज्ज्ञ सांगतात..

'अनलाइकली हिरो ओम पूरी' या पुस्तकात असे म्हटले की, अभिनेत्याचे वडील आजारी होते. त्यांची काळजी घेण्यासाठी एका मोलकरणीला ठेवण्यात आले होते. ही घटना ओम पूरी १४ वर्षांचे असताना घडली. एके दिवशी, घरातील लाईट गेली होती. त्यानंतर मोलकरणीनं यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले होते, असा खुलासा पुस्तकातून करण्यात आला होता.

कल्याण - डोंबिवलीत शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली; शरद पवार गटातील बडा नेता गळाला लागला

ओम पूरी यांच्या मते, घरी काम करण्यासाठी येणारी बाई, त्यांची पहिली प्रेमिका होती. ओम पूरी म्हणाले, 'माझे वडील ८० वर्षांचे होते. त्यांची काळजी घेण्यासाठी कुणीही नव्हते. ती महिला कधीच मला केवळ मोलकरीण वाटली नाही. आमच्या संपूर्ण कुटुंबाची काळजी घेत होती. ती घटस्फोटीत होती आणि मी तेव्हा विवाहित नव्हतो', असं ओम पूरी म्हणाले.

ओम पूरी म्हणाले की, 'या संदर्भातील माहिती मी माझ्या पत्नीला दिली होती', असं ते म्हणाले. ओम पूरी यांच्या पत्नीने याबद्दलची माहिती पुस्तकात छापली. त्यावेळी ओम पूरी पत्नीवर खूप नाराज झाले होते. त्यावेळी ओम पूरी म्हणाले, 'हे सर्व पुस्तकात अत्यंत घाणेरड्या पद्धतीने मांडलं गेलंय. पत्नीला वैयक्तिक आयुष्यातील गुपितं विश्वासाने होते. पण पुस्तकाचा खप व्हावा यासाठी तिनं या सगळ्या गोष्टी पुस्तकात मांडल्या'. 'माझ्या आयुष्यात अनेक संघर्षमय तसेच प्रेरणादायी प्रसंग होते. मात्र, पुस्तकात फक्त लैंगिक संबंधावर लक्ष केंद्रीत करण्यात आलं', असं ही ओम पूरी म्हणाले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.