Beed News : बीडमधील गेवराईत धनगर आरक्षणाचा बळी, एसटी प्रवर्गात समावेश होत नसल्याने मादळमोहीच्या युवकाने घेतला गळफास
esakal October 20, 2025 09:45 AM

गेवराई : धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळत नसल्याने खिशात चिठ्ठी लिहून एका युवकाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना बीडमधील गेवराईतील मादळमोही येथे शनिवारी सकाळी घडली.

योगेश बबन चौरे (वय ३३)रा.मादळमोही ता.गेवराई जि.बीड असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.पोलिसांकडून पंचनामा करण्यात आल्यानंतर मृत युवकाच्या खिशात एक चिठ्ठी आढळुन आली.या चिठ्ठीत त्याने धनगर समाजाला एसटी मधून आरक्षण मिळत नसल्याने आत्महत्या करत असल्याचा मजकूर होता.

Pune News: हिंजवडीत दिवाळीची धामधूम; मॉल्स, बाजारपेठा आणि फूड स्ट्रीट्स आयटी कर्मचाऱ्यांच्या गर्दीने उजळल्या!

यावरुन धनगर समाज संतप्त होत शासनाने धनगर समाजाला आरक्षण देण्यात यावे अशी मागणी केली.आणखी किती बाई घेणार अशा संतप्त भावना देखील व्यक्त करण्यात येत होत्या. दरम्यान, या घटनेनंतर बीडचे यशवंत सेनेचे प्रमुख भारत सिन्नर यांनी घटनास्थळावर धाव घेत कलेक्टर विवेक जॉन्सन यांच्याशी संपर्क करत याचा प्रस्ताव दाखल करण्याची मागणी केली.यावरून गेवराईचे तहसिलदार संदिप खोमने आणि पोलीस प्रशासनाकडून रितसर पंचनामा करण्यात आला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.