गराडे, ता. १९ : आंबोडी (ता. पुरंदर) येथे तीस वर्षाचा पारंपरिक भक्तीभाव जपणारा अखंड काकड आरती सोहळा मोठ्या उत्साहात सुरू आहे.
पुरंदर तालुका सोपानकाका संप्रदाय ट्रस्टचे उपाध्यक्ष अमृता बोरकर व ग्रामस्थांच्या यांच्या पुढाकाराने हा सोहळा अखंडपणे संपन्न होत आहे. ग्रामस्थांच्या सहभागातून पहाटे भजनी मंडळ, संप्रदायातील भाविक टाळ- मृदुंगाच्या तालावर हरिपाठ, अभंग आणि आरत्यांमधून भक्तिभावाने आरती सोहळा साजरा होतो. हा अखंड आरती सोहळा गावात भक्तिमय वातावरण सुरू असून, सामूहिक श्रद्धा, सेवाभाव आणि एकीचे प्रतीक म्हणून सर्व गाव एकत्र येतो व आरती सोहळा साजरा केला जात आहे.
महाप्रसाद पुरंदर तालुका सोपानकाका संप्रदाय ट्रस्टचे उपाध्यक्ष अमृता बोरकर, किसन बोरकर, भगवान बोरकर, माणिक भांडवलकर, महादेव भांडवलकर, सुभाष भांडवलकर, दत्तात्रेय सोनवणे, रामदास बोरकर, प्रथम बोरकर, भगवान बोरावके आदींच्या वतीने केला जातो. सोपानकाका भजनी मंडळ महिला मंडळाच्या सुभद्रा बोरकर, रेश्मा बोरकर व आंबोडी समस्त ग्रामस्थ मंडळ यांचा सहभाग आहे.
11961