Solapur News: 'साेलापूर जिल्ह्यात ६७ हजार घरकुलांचे बांधकाम सुरु'; पंधरा हजारांचा पहिला हप्ता वितरीत; १६ हजार लाभार्थींची सुरूवातच नाही
esakal October 20, 2025 09:45 AM

सोलापूर : प्रधानमंत्री आवास योजनेतून २०२५-२६ वर्षासाठी जिल्ह्यातील एक लाख तीन हजार घरकुलांना मंजुरी देण्यात आली. त्यापैकी ८७ हजार घरकुलांचे बांधकाम सुरू झाले आहे. आतापर्यंत लाभार्थींना प्रत्येकी १५ हजारांचा पहिला हप्ताही वितरित झाला आहे. मात्र, अजूनही १६ हजार लाभार्थींनी पहिला हप्ता घेऊनही बांधकामाला सुरवात केलेली नाही. त्या लाभार्थींचा शोध घेऊन आता त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या जाणार आहेत.

Arya Chavan: आर्या चव्हाणच्या मारकऱ्याला फाशीच द्या! 'सातारा सकल मराठा क्रांती मोर्चासह ग्रामस्थ आक्रमक'; खटला जलदगती न्यायालयात चालवा

बांधकाम साहित्य (स्टील, सिमेंट, विटा, मजुरी) महागले आहे. त्यामुळे शासनाकडून घरकुलासाठी मिळणाऱ्या एक लाख २० हजार रुपयांत घरकूल बांधून पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील १६ हजार बेघर लाभार्थींनी बांधकाम सुरू करण्यापूर्वी सावध भूमिका घेतली आहे. त्यांची बांधकामाची तयारी आहे, पण तीन लाखांचा खर्च करण्यास अडचणी असल्याने त्यांनी बांधकामे सुरू केलेली नाहीत. राज्य सरकारने घरकूल लाभार्थींना वाढीव ५० हजार रुपयांचे अनुदान देण्याचा एप्रिल २०२५ मध्ये निर्णय घेतला. मात्र, अजूनही वाढीव अनुदान मिळू शकलेले नाही. दरम्यान, जिल्ह्यातील महापूर, अतिवृष्टीमुळेदेखील अनेक लाभार्थींना कामे सुरू करता आलेली नाहीत.

लाभार्थींसमोर अडचणींचा डोंगर

घरकूल बांधकामासाठी किमान तीन लाख रुपये लागतात, पण सध्या मिळतात १.२० लाख रुपयेच.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून घरकूल बांधकामाची २८ हजारांची मिळते मजुरी; पण ३ महिने झाले दमडीही मिळाली नाही.

घरकूल लाभार्थींना वाढीव ५० हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निघाला शासन निर्णय, पण अजूनपर्यंत जिल्ह्यातील एकाही लाभार्थीला वाढीव रक्कम मिळाली नाही.

घरकूल लाभार्थींना मोफत वाळू देण्याची घोषणा, पण जिल्ह्यातील ८० हजारांहून अधिक लाभार्थी मोफत वाळूच्या प्रतीक्षतेच.

सोलापूर जिल्ह्यातील एक लाख तीन हजार बेघर लाभार्थींना घरकूल मंजूर झाले आहे. त्यापैकी ८७ हजार घरकुलांची कामे सुरू आहेत. ज्यांनी पहिला हप्ता घेऊनही कामे सुरू केली नाहीत, त्यांना लवकर काम सुरू करण्याच्या सूचना ग्रामपंचायत स्तरावरून दिल्या जात आहेत.

- रतिलाल साळुंखे, सहायक प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, सोलापूर

MPSC Success Story:'लिंबच्या सुनबाईची कष्टाच्या जाेरावर यशाला गवसणी';'एमपीएससी'त साधली हॅट्रिक, वडिलांचं स्वप्न उतरवलं सत्यात! जिल्ह्यातील घरकुलांची स्थिती
  • एकूण मंजूर घरकुले: १.०३ लाख

  • पहिला हप्ता मिळाला : १५,०००

  • घरकुलांचे बांधकाम सुरू: ८७,०००

  • बांधकाम सुरू नसलेली घरकुले : १६,०००

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.