कसारा घाटात कामगारांचा बिऱ्हाड मोर्चा, मागण्या पूर्ण न झाल्यास मुंबईकडे मोर्चा वळवणार
Saam TV October 20, 2025 09:45 AM
  • आदिवासी आश्रम शाळेतील रोजंदारी कामगारांचा बिर्हाड मोर्चा मुंबईच्या वेशीवर

  • मागण्या पूर्ण न झाल्यास मोर्चा मुंबईच्या दिशेने वळवणार असल्याचा इशारा कामगारांनी दिला

  • पोलिसांनी कसारा घाट आणि इंगतपुरी परिसरात चोख बंदोबस्त ठेवला आहे

  • महिलांचा मोठा सहभाग असल्याने पोलिसांपुढे मोठं आवाहन आहे

राज्यातील आदिवासी आश्रम शाळेतील रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगाराचा बिर्हाड मोर्चा आज मुंबई च्या वेशीवर येऊन ठेपला आहे. विविध मागण्यासाठी कामगाराचा बिर्हाड मोर्चा १४ ऑक्टोबर रोजी नाशिक येथून मुंबई कडे निघाला. आज १८ ऑक्टोबर रोजी हा मोर्चा मुंबईच्या वेशीवर म्हणजेच कसारा घाटावर येऊन ठेपला आहे. बिर्हाड मोर्चातील आंदोलकांनी कसारा घाटाजवळ ठिय्या आंदोलन करीत राज्य शासनाचा निषेध केला.

मिळालेल्या माहितीनुसार, आदिवासी आश्रम शाळेतील रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगाराचा बिर्हाड मोर्चा मुंबईच्या वेशीवर धडकला आहे. कामगारांच्या काही प्रमुख मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. मागील वर्षी आदिवासी विकास मंत्र्यांनी आश्वासन देऊन देखील रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत. अखेर कामगारांना न्याय मिळावा यासाठी सुमारे ३०० जनांचा हा मोर्चा मुंबईच्या वेशीवर आला आहे.

Shocking News : आईच्या मृतदेहासोबत बंद खोलीत कोंडून घेतलं, १३ वर्ष घराबाहेर पडला नाही, नेमकं काय प्रकरण

दरम्यान या मोर्चासाठी कसारा घाटात ठाणे ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉक्टर.डी. एस. स्वामीं, उपविभागीय पोलीस अधीक्षक् मिलिंद शिंदे याच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी संदीप गिते कसारा पोलीस निरीक्षक सुरेश गावित ,इंगतपुरी पोलीस निरीक्षक सारिका आहिररावं यांनी चोखं बंदोबस्त ठेवला होता .

Thackeray Shivsena News : ठाकरेंच्या शिवसेना नेत्याला जीवे मारण्याची धमकी, गुंडाच्या त्या कृत्यामुळे कल्याणमध्ये संताप, वाचा नेमकं काय घडलं?

दरम्यान या मोर्चात आंदोलकांनी आज् दुपार पासून इंगतपुरी जवळ नाशिक मुंबई लेन वर ठिय्या आंदोलन सुरु करीत एक लेन बंद करून टाकली आहे. पर्याय म्हणून वाहतूक पोलिसांनी मुंबईकडे जाणारी वाहतूक पर्यायी रस्त्याने वळवली .दरम्यान मोर्चे कराणी आपला मोर्चा रस्त्यावरच ठाण मांडून ठेवत मुक्काम ठोकला आहे. सकाळ पर्यंत निर्णय न लागल्यास तीव्र आंदोलन करीत मोर्चा मुंबईच्या दिशेने वळवू असा या आंदोलकांनी इशारा दिला आहे. दरम्यान बिर्हाड मोर्चात महिलांचा सहभाग जास्त असल्याने पोलिसांसमोर मोठे आवाहन उभे राहिले आहे.

Corruption Exposed : २.६२ कोटींची रोकड, ९ फ्लॅट अन् लक्झरी गाड्या; सरकारी अधिकाऱ्याला CBI ने लाच घेताना रंगेहात पकडले कामगाराची प्रमुख मागणी काय ?

आंदोलकांनी बाह्यस्त्रोत एजन्सीद्वारे केल्या जाणाऱ्या भरत्या रद्द करा ही मागणी आग्रही धरली आहे. शिवाय कामावरून कमी केलेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घ्यावे, अशी मागणी आंदोलकानी केली. कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम असून नोकरीवर परत घेण्याचे आदेश मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे मोर्चाचे नेतृत्व करणारे ललित चौधरी यानि सांगितले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.