टीम इंडियाला रविवारी 19 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलिया विरुद्ध एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात पराभूत व्हावं लागलं. ऑस्ट्रेलियाने डीएलएसनुसार मिळालेलं 131 धावांचं आव्हान हे 3 विकेट्स गमावून पूर्ण केलं. त्यानंतर आता भारतीय क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा खेळाडू परवेझ रसूल याने क्रिकेटला अलविदा केला आहे. परवेझने बीसीसीआयला आपल्या निवृत्तीबाबतची माहिती दिली आहे.