Latest Marathi News Live Update : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने अर्ध नग्न आंदोलन
esakal October 21, 2025 04:45 PM
Live: स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने अर्ध नग्न आंदोलन

छत्रपती संभाजी नगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या घरासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने अर्ध नग्न आंदोलन करण्यात आले. अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी द्या, संपूर्ण कर्जमाफी करा अशी मागणी या आंदोलनकर्त्यांनी केली. जिल्हाधिकारी कार्यासमोर आंदोलन आंदोलन करीत असल्याने पोलिसांचा मोठा बंदोबस्त येणार होता. तातडीने अर्ध नग्न आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी आंदोलन शेतकऱ्यांनी आणि स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार सरकार विरोधात घोषणाबाजी केली.

Live: बुलढाणा जिल्ह्यातील पिंप्री गावात डायरियाची लागण

बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यामधल्या दुर्गम अशा पिंप्री आडगाव या गावात दिवाळीच्या दिवशी अतिसाराची लागण मोठ्या प्रमाणात झालेली आहे... या गावांमध्ये नळ योजना कार्यान्वित नसून ग्रामस्थांना एका विहिरीवरून पाणी भरावे लागते.. विहिरीला जे झरे फुटलेले आहेत ते दूषित पाण्याचे असल्यामुळे या ग्रामस्थांना अतिसाराची लागण झाली असं ग्रामस्थ सांगतात.... अतिसाराची लागण झाल्यानंतर खरंतर आरोग्य यंत्रणा या ठिकाणी पोहोचायला हवी होती मात्र ग्रामस्थांनी आरोप केलाय की यंत्रणा या ठिकाणी पोहोचलीच नाही.... त्यांना खाजगी रुग्णालयात जावे लागते

Live: झेंडू फुलांची आवक वाढली,दर मात्र घसरले

आज लक्ष्मी पूजनासाठी मनमाड शहरात अनेक शेतकरी झेंडू फुले घेऊन विक्रीसाठी आले आहे,फुलांची मोठी आवक असल्याने अनेक शेतकरी मिळेल तेथे जागोजागी दुकाने लावत शेतकरी फुले विक्री करताना दिसत असून,फुलांच्या दारात मात्र घसरण झाली आहे,20 रुपये किलोने फुलांची विक्री होत आहे,तर दसऱ्याला झेंडूच्या फुलांना 60 रुपये किलो चा दर मिळालेला असताना दिवाळीच्या सणा ला मात्र दरात घसरण झाली,असून दुपारनंतर यात आणखी घसरण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Sanjay Raut Live : मत चोरी, घोटाळे यातूनच महायुतीचा विजय-संजय राऊत

खासदार संजय राऊतांनी भाजपवर मोठा हल्लाबोल चढवला. मत चोरी, घोटाळे यातूनच महायुतीचा विजय झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

Navi Mumbai Live : वाशीत इमारतीला आग, चार जणांचा मृत्यू

नवी मुंबईतील वाशीमध्ये एका इमारतीला भीषण आग लागल्याने चार जणांचा गुदमरुन मृत्यू झाला.

Ulhasnagar Live : उल्हासनगरमध्ये खुर्ची बनविण्याच्या कारखान्याला आग

उल्हासनगरमध्ये खुर्ची बनविण्याच्या कारखान्याला भीषण आग लागली. यात लाखोंचे नुकसान झाले आहे, एक तासाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आग विझवण्यात आली.

Mumbai Live : दादरमध्ये धुक्याची दुलई

मुंबईतील दादर बीच परिसरात धुक्याचा पातळ थर दिसून आला.

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पोलीस हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पोलीस हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. पुण्यातील पाषाण संशोधन केंद्र येथे कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाप्रसंगी तब्येत व्यवस्थित नसल्याने अजितदादा बोलणार नाहीत.

Belgaum News : गुरुवारपासून पुन्हा शाळा बहरणार, दसरा सुटीनंतर महिन्याने वर्ग भरणार

बेळगाव : दसरा सुटीनंतर गुरुवारपासून (ता. २३) पुन्हा शाळांना सुरुवात होणार आहे. त्यामुळे शाळा सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना कराव्यात, अशी सूचना शिक्षण खात्यातर्फे सरकारी आणि अनुदानित शाळांना करण्यात आली आहे. सहामाही परीक्षा पूर्ण झाल्यानंतर २२ सप्टेंबरपासून दसरा सुटीला सुरुवात झाली होती. तसेच ७ ऑक्टोबरपासून पुन्हा शाळा सुरू होणार होत्या. परंतु, आर्थिक आणि शैक्षणिक सर्वेक्षणाचे काम वेळेत पूर्ण होऊ न शकल्याने दसरा सुटीत वाढ करण्यात आली होती.

Belgaum News : परवानगीसाठी प्रशासनाकडे आता तगादा लावणार नाही; काळा दिन फेरी काढण्याचा समितीचा निर्धार

बेळगाव : आपल्या न्याय्य हक्कांसाठी आणि अन्यायाविरोधात निषेध नोंदविण्याचा सर्वांना अधिकार आहे. त्यामुळे परवानगीसाठी प्रशासनाकडे तगादा न लावता काळा दिनाच्या फेरीबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याचा निर्णय महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे घेण्यात आला आहे. यासाठी समिती कार्यकर्त्यांनी विविध गावांमध्ये आणि आपल्या भागात जनजागृती बैठका घेऊन काळा दिनाची फेरी यशस्वी व्हावी यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

Actor Govardhan Asrani : हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आणि हरहुन्नरी कलाकार गोवर्धन असरानी (वय ८४) यांचे सोमवारी (ता. २०) दीर्घ आजाराने निधन झाले. असरानी यांच्या पश्चात पत्नी मंजू असरानी, बहीण, पुतण्या असा परिवार आहे.

Mahadev Shivankar : माजी खासदार महादेव शिवणकर यांचे निधन, पार्थिवावर आज अंत्यसंस्कार

आमगाव : अर्थ व पाटबंधारे विभागाचे माजी मंत्री तथा चिमूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार भाजपचे ज्येष्ठ नेते प्रा. महादेवराव शिवणकर (वय ८५) यांचे सोमवारी सकाळी आमगाव येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज (ता. २१) सकाळी दहा वाजता साकरीटोला घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

Lakshmi Puja : राज्यभरात दीपोत्सवाचा चैतन्यसोहळा; आज घरोघरी होणार लक्ष्मीपूजन

Latest Marathi Live Updates 21 October 2025 : ‘‘संपू दे अंधार सारा, उजळू दे आकाश तारे, गंधाळल्या पहाटेस येथे वाहू दे आनंद वारे...’’ अशा शुभेच्छांच्या वर्षावात सोमवारी शहर आणि जिल्ह्यात दीपोत्सवाचा चैतन्यसोहळा सजला. आज (मंगळवारी) घरोघरी लक्ष्मीपूजन होणार आहे. तसेच हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आणि हरहुन्नरी कलाकार गोवर्धन असरानी (वय ८४) यांचे सोमवारी (ता. २०) दीर्घ आजाराने निधन झाले. असरानी यांच्या पश्चात पत्नी मंजू असरानी, बहीण, पुतण्या असा परिवार आहे. ‘‘भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे सुरूच ठेवले, तर भारतावर प्रचंड प्रमाणात आयातशुल्क लादण्यात येईल,’’ अशी धमकी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दिली आहे. अर्थ व पाटबंधारे विभागाचे माजी मंत्री तथा चिमूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार भाजपचे ज्येष्ठ नेते प्रा. महादेवराव शिवणकर (वय ८५) यांचे सोमवारी सकाळी आमगाव येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज (ता. २१) सकाळी दहा वाजता साकरीटोला घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. राज्यात अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना राज्याच्या महसूल व वन विभागाने ६४८ कोटी १५ लाख ४१ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. सोने, चांदी दागिन्यांच्या खरेदीसाठी आजही ठिकठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. धनत्रयोदशीलाही ग्राहकांचा सोने खरेदीस चांगला प्रतिसाद मिळाला होता. लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर सोन्याच्या भावात ३८०० रुपयांची (प्रतिदहा ग्रॅम) तर चांदीच्या भावात (प्रतिकिलो) दहा हजार रुपयांची घसरण झाली आहे. सोन्याचा भाव प्रतिदहा ग्रॅमला १ लाख २१ हजारांवर (‘जीएसटी’ विना) पोचला आहे. चांदीच्या भावात दहा हजारांची घसरण होऊन ती १ लाख ६५ हजारांवर (विना जीएसटी) आली आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.