तुमच्या शहरात कोणत्या रुग्णालयात मिळतात मोफत उपचार, पण कसे? जाणून घ्या संपूर्ण माहिती
Tv9 Marathi October 21, 2025 04:45 PM

PM Ayushman Yojana Find Hospitals: पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या काही वर्षांपासून अनेक योजना राबवत आहेत. त्यातील एक म्हणजे आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना… या योजने अंतर्गत भारतीय नागरिक स्वास्थ्य लाभ घेऊ शकतात. या योजनेचं मुख्य उद्देश म्हणजे देशातील गरीब आणि मध्यम वर्गीय कुटुंबातील सदस्यांना मोफत उपचार देण… या योजनेअंतर्गत, आयुष्मान कार्डधारक कोणतेही शुल्क न भरता सरकारी आणि मान्यताप्राप्त खाजगी रुग्णालयांमध्ये रुग्णालयाचा खर्च करू शकतात.

याठिकाणी सर्वात मोठा प्रश्न उपस्थित राहतो तो म्हणजे, तुमच्या शहरात कोण-कोणते रुग्णालय या योजनेशी जोडलेले आहे. जेथे तुम्ही योजनेचा लाभ घेऊ शकता… कारण जर तुम्हाला याबद्दल आधीच माहिती असेल तर शेवटच्या क्षणी तुम्हाला कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे फायदे

तुमच्या शहरातील बहुतेक सरकारी रुग्णालये आयुष्मान भारत योजनेशी संलग्न आहेत. या प्रमुख रुग्णालयांमध्ये जिल्हा रुग्णालये, राज्य सरकारी वैद्यकीय महाविद्यालये आणि शहरातील रुग्णालये समाविष्ट आहेत. या रुग्णालयांमध्ये कार्ड धारकाचे उपचार, ऑपरेश, मेडिकल टेस्ट आणि औषधं सर्वकाही मोफत मिळेल.

या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे, आर्थिक परिस्थितीमुळे कोणताही रुग्ण उपचारांपासून वंचित राहू नये. या योजनेत सरकारी रुग्णालयांमध्ये अनेक उपचार आणि शस्त्रक्रियांचा समावेश आहे. ज्यामध्ये हृदय शस्त्रक्रिया, मूत्रपिंड समस्या, कर्करोग उपचार आणि सामान्य शस्त्रक्रिया यांचा समावेश आहे. या सर्व आरोग्य सेवा उपलब्ध आहेत.

रुग्णालय कुठे आहे कसं तपासाल?

तुमच्या शहरातील किंवा परिसरातील कोणती रुग्णालये आयुष्मान कार्ड वापरून उपचार देतात हे जाणून घ्यायचे असेल, तर ते करण्याचा सोपा मार्ग म्हणजे ऑनलाइन. सर्वात आधी आयुष्मान भारत योजनेचं अधिकृत पोर्टल https://hospitals.pmjay.gov.in/Search/ ला भेट द्या. त्यानंतर Find Hospitals सेक्शनवर क्लिक कला. त्यानंतर तुमचं राज्य, जिल्हा, शहर, पिनकोड टाकण्यासाठी ऑप्शन मिळेल…

याठिकाणी तुम्हा सरकारी आणि खासगी रुग्णालय देखील निवडू शकता. सर्व माहिती भरल्यानंतर सर्चवर क्लित करा. त्यानंतर तुमच्या शहरातील सर्व रुग्णालयाची यादी समोर येईल.. यादीमध्ये रुग्णालयाचं नव, पत्ता, संपर्क क्रमांत आणि उपलब्ध सेवा देखील नमूद केलेल्या असतील… कोणत्याही रुग्णालयावर क्लिक करून, तुम्ही त्याची संपूर्ण माहिती आणि पॅनेलमध्ये समाविष्ट केलेले उपचार पॅकेजेस देखील पाहू शकता.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.