कतरची राजधानी दोहा येथे अफगाणिस्तान-पाकिस्तान यांच्यात युद्धविराम झाला. युद्धाविरामाच्या या डीलमध्ये अफगाणिस्तानने पाकिस्तानचा मोठा गेम केला. महत्त्वाच म्हणजे तुर्की या शांतता कराराच्या वाटाघाटीमध्ये सहभागी झालेला असताना हे सर्व घडलं. तुर्की पाकिस्तानचा मोठा पाठिराखा आहे. ऑपरेशन सिंदूरच्यावेळी त्यांनीच पाकिस्तानला भारतावर हल्ले करण्यासाठी ड्रोन्सचा पुरवठा केला होता. युद्धविरामात झालेली फजिती जगजाहीर होऊ नये, यासाठी पाकिस्तानने आता शांतता कराराचे डिटेल्स सार्वजनिक न करण्याचा निर्णय घेतला आहे.
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांच्यानुसार शांतते संदर्भात अजूनही बोलणी सुरु आहेत. त्यामुळे डिटेल आम्ही सार्वजनिक करणार नाही. या महिन्याच्या सुरुवातीला पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये सलग पाच दिवस युद्ध चाललं. त्यानंतर कतरच्या हस्तक्षेपाने दोन्ही देशांमध्ये युद्धविराम झाला.
पाकिस्तानला चर्चा करावी लागली
पाकिस्तान आधी तालिबान सरकारला बिगर लोकशाही मार्गाने निवडून आलेलं सरकार ठरवत होता. पण कतरने दबाव टाकल्यानंतर पाकिस्तान चर्चेसाठी तयार झाला. 2021 साली अफगाणिस्तानात निवडून आलेल्या सरकारला हटवून तालिबान फायटर्सनी काबूलवर झेंडा फडकवलेला. तेव्हापासून अफगाणिस्तानात तालिबानच सरकार आहे.
पाकिस्तानला कुठे झटका बसला?
पाकिस्तानला युद्धविरामापेक्षा डूरंड लाइन आणि तहरीक ए तालिबानचे दहशतवादी या मुद्यांवर चर्चा करायची होती. पण या दोन्ही मुद्यांवर त्यांना झटका बसला. दोहा येथील बैठकीत ना डूरंड लाइनबद्दल काही बोलणं झालं, ना तहरीक ए तालिबानच्या दहशतवाद्यांबद्दल.
अफगाणिस्तानने कशी सरशी साधली?
तालिबानने दोहामध्ये ज्या 3 मागण्या मांडलेल्या त्यावर एकमत झालं. व्यापाराचा मार्ग उघडला जावा, हा तालिबानचा प्रयत्न होता. पाकिस्तानने तो मार्ग बंद केलेला. इतकच नाही, आता तालिबानवर हल्ला करणार नाही हे सुद्धा पाकिस्तानने मान्य केलं आहे. म्हणजे अफगाणिस्तानच्या सगळ्या मागण्या मान्य झाल्या आहेत.
कतरला त्यांचं स्टेटमेंट मागे घ्यावं लागलं
पाकिस्तान डूरंड लाइनला अफगाणिस्तानची अधिकृत सीमा मानतो. तालिबानच म्हणणं आहे की, ही एक नकली लाइन आहे. या लाइनवरुन कुठल्या देशाची सीमा निश्चित होऊ शकत नाही. खैबरच्या काही भागावर सुद्धा तालिबानचा दावा आहे. डूरंड लाइनवरुन शांती करार झाल्यानंतर कतरने एक स्टेटमेंट जारी केलं. नंतर त्यांना ते मागे घ्यावं लागलं.
पाकिस्तानच म्हणणं काय?
पाकिस्तानच म्हणणं आहे की, टीटीपी नावाच्या दहशतवादी संघटनेने त्यांच्या नाकात दम केला आहे. टीटीपीला अफगाणिस्तानात आसरा मिळतो. टीटीपीकडे अफगाणिस्तानात जवळपास 8 हजार दहशतवादी आहेत. अफगाणिस्तानच म्हणणं आहे की, हे सर्व वाट्टेल ते आरोप आहेत. पाकिस्तानच्या आत ISIS सारख्या दहशतवादी संघटना सक्रीय आहेत.