शेअर्सने दिला तब्बल 25 हजार टक्के परतावा, आता पहिल्यांदाच Bonus Shares देणार, Stock Split ही करणार
ET Marathi October 21, 2025 07:45 PM
मुंबई : कीटकनाशके आणि कृषी रसायन उद्योगातील कंपनी भारत रसायन लिमिटेडने त्यांच्या भागधारकांसाठी बोनस शेअर्स देण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर सोमवारी बीएसईवर भारत रसायनचे शेअर्स ११% पेक्षा जास्त वाढले आणि ते १०,९९० रुपयांवर पोहोचले. Bharat Rasayan Limited पहिल्यांदाच त्यांच्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स देणार आहे. कंपनी शेअर स्प्लिटची योजना देखील आखत आहे.



संचालक मंडळाची बैठक



Bharat Rasayan Limited ने जाहीर केले आहे की, संचालक मंडळाची बैठक २४ ऑक्टोबर, रोजी होणार आहे. या बैठकीत संचालक मंडळ चालू आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीच्या निकालांसह शेअरधारकांना bonus shares देणे आणि stock split करण्याचा विचार करेल. कंपनीने अद्याप बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटसाठी रेकॉर्ड तारीख निश्चित केलेली नाही. कंपनीच्या संचालक मंडळाने या प्रस्तावांना मान्यता दिली, तर भारत रसायन त्यांच्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स आणि स्प्लिट शेअर्स देण्याची ही पहिलीच वेळ असेल.



शेअर्सचा परतावा



गेल्या २० वर्षात भारत रसायन लिमिटेडच्या शेअर्समध्ये २५,०००% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. १ नोव्हेंबर २००५ रोजी या मल्टीबॅगर कंपनीचे शेअर्स ३८.२५ रुपयांवर होते. २० ऑक्टोबर २०२५ रोजी भारत रसायनचे शेअर्स १०,११८.८० रुपयांवर बंद झाले. गेल्या १० वर्षात शेअर्समध्ये ९९१% ची वाढ झाली आहे. मात्र, गेल्या पाच वर्षांत शेअर्समध्ये फक्त १४% वाढ झाली आहे. गेल्या एका वर्षात भारत रसायनच्या शेअर्समध्ये जवळपास १०% घट झाली आहे. शेअर्सचा ५२ आठवड्यांचा उच्चांक १२,५५० रुपये आहे. तर शेअर्सची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी ८८०७.४५ रुपये आहे.
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.