Washim : गांजाची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक; १२ किलो गांजा जप्त
Saam TV October 21, 2025 07:45 PM

मनोज जयस्वाल 

वाशिम : गांजाची वाहतूक कारवाई केल्यानंतर देखील थांबत नसल्याचे पाहण्यास मिळत आहे. त्यानुसार वाशीम जिल्ह्यात देखील गांजा तस्करी पुन्हा एकदा उघड झाली आहे. वाशिमच्या स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करून अवैधरीत्या गांजा वाहतूक करणाऱ्या दोन व्यक्तींना ताब्यात घेतले आहे. त्यांच्या जवळून १२ किलो गांजा आणि एक दुचाकी असा एकूण १ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

वाशीमजिल्ह्यातून गांजाची तस्करी केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुप्त माहितीच्या आधारे कारंजा-मंगरूळपीर रोडवर गस्त घालत होते. रात्री साधारण दीड वाजताच्या सुमारास दुचाकीवरून संशयास्पदरीत्या दोन व्यक्ती मंगरूळपीरकडे जाताना आढळून आले. यानंतर पोलिसांनी त्यांचा पाठलाग करत त्यांच्या जवळील पिशवीची तपासणी केली असता, त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गांजा आढळून आला. 

Hingoli Crime : शुल्लक कारणातून व्यापाऱ्याला दोघांची मारहाण; घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद

गांजासह दोघांना घेतले ताब्यात 

यानंतर पोलिसांनी या दोघानांही ताब्यात घेण्यात आले. यात ज्ञानेश्वर दयाराम मुखमले (वय २५, रा. गोगरी, ता. मंगरूळपीर) आणि कृष्ण ऊर्फ कुणाल गजानन पुसाडे (वय २१, रा. शेलू बाजार, ता. मंगरूळपीर) अशी संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या गांजाचे वजन १२ किलो असून त्याची किंमत १ लाख २० हजार रुपये एवढी आहे. दरम्यान त्यांची अधिक चौकशी पोलीस करत आहेत. 

Banjara Community : बंजारा समाज पुन्हा एकदा आक्रमक; एसटी प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीसाठी बेमुदत उपोषण

दोघांविरुद्ध गुन्हा दाखल 

पोलिसांनी संशयितांकडील दुचाकीची किंमत ७० हजार रुपये असा एकूण १ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मंगरूळपीर पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सरू आहे. मात्र या कारवाईमुळे पुन्हा एकदा गांजा तस्करी उघड झाली आहे. 

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.