Muhurat Trading 2025: दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर विशेष ट्रेडिंग सत्रात भारतीय शेअर बाजारात सोमवारी (21 ऑक्टोबर) जोरदार तेजी पाहायला मिळाली. जागतिक बाजारातून मिळालेल्या सकारात्मक संकेतांच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी खरेदी केली.
सत्राच्या सुरुवातीला बीएसई सेन्सेक्स 267.08 अंकांनी वाढून 84,630.45 वर पोहोचला, तर निफ्टी 80.90 अंकांनी वाढून 25,924.05 वर स्थिरावला. सुमारे 1,016 शेअर्समध्ये वाढ, 284 शेअर्समध्ये घसरण आणि 85 शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही.
Gold Reserves: आरबीआयचा सोन्याचा साठा पहिल्यांदाच 100 अब्ज डॉलर्सच्या वर; भारताचा परकीय चलन साठा किती आहे?निफ्टीवरील इन्फोसिस, टेक महिंद्रा, डॉ. रेड्डीज लॅब्स, टाटा मोटर्स आणि अदानी पोर्ट्स हे प्रमुख शेअर्स वाढले, तर आयसीआयसीआय बँक आणि एशियन पेंट्स यांमध्ये थोडी घसरण झाली.
परदेशी गुंतवणूकदारांनी (FII/FPI) 20 ऑक्टोबर रोजी ₹790 कोटींची खरेदी केली, तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DII) ₹2,486 कोटींच्या शेअर्समध्येगुंतवणूक केली, अशी माहिती एक्सचेंजच्या प्राथमिक आकडेवारीतून मिळाली.
Gold Jewellery: 0 टक्के मेकिंग चार्जेसच्या नावाखाली ज्वेलर्स करत आहेत ग्राहकांची फसवणूक; होऊ शकतं लाखोंच नुकसानया आर्थिक वर्षात आतापर्यंत FII हे ₹2.39 लाख कोटींच्या विक्रीसह निव्वळ विक्रेते ठरले आहेत, तर DII यांनी ₹6.03 लाख कोटींच्या शेअर्सची खरेदी करून बाजारात स्थैर्य राखले आहे.
दिवाळीच्या शुभ प्रसंगी गुंतवणूकदारांनीबाजारात सकारात्मक सुरुवात करत नव्या संवत 2082 च्या आर्थिक प्रवासाला उत्साहाने सुरुवात केली आहे.
आज अनेक मिडकॅप आणि बँकिंग शेअर्समध्ये गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली. विशेषतः DCB बँकच्या शेअरमध्ये तब्बल 5 टक्क्यांची वाढ झाली, तर साउथ इंडियन बँकमध्येही 4 टक्क्यांहून अधिक वाढ झाली. गुंतवणूकदारांचा उत्साह टाटा इन्व्हेस्टमेंटच्या शेअरमध्येही दिसला, ज्यात 6 टक्क्यांची वाढ झाली.
बीएसईवरील टॉप 30 शेअर्सपैकी फक्त 6 शेअर्समध्येच घसरण झाली. त्यापैकी कोटक महिंद्रा बँकचा शेअर सुमारे 1 टक्क्यांनी खाली आला. दुसरीकडे, इन्फोसिसचा शेअर जवळपास 1 टक्क्यांनी वाढला, जो आजच्या टॉप गेनर्सपैकी एक ठरला.
याशिवाय बजाज फायनान्स, अदानी पॉवर, इन्फोसिस, सिप्ला, हुंडई मोटर्स इंडिया आणि टाटा मोटर्स सारख्या कंपन्यांच्या शेअर्समध्येही 1 टक्क्यांहून अधिक तेजी पाहायला मिळाली.
एकूणच दिवाळीच्या मुहूर्त ट्रेडिंगमध्ये बाजारात उत्साहाचं वातावरण होतं. बँकिंग, आयटी आणि मिडकॅप शेअर्समध्ये गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी केल्याने बाजारात सकारात्मकत वातावरण कायम आहे.