पिंपरी, ता. २१ : पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत १७ ते २० ऑक्टोबर या कालावधीत आगीच्या २९ घटना घडल्या. काही आगी किरकोळ, तर काही मोठ्या होत्या. दिवाळीत आगीच्या घटना वाढत असल्याने महापालिकेच्या अग्निशामक विभागाची सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
शुक्रवारी (ता. १७) मोरवाडी, चिखली, भोसरी; शनिवारी (ता. १८) प्राधिकरण, चिखली, वाकड; रविवारी (ता. १९) सांगवी, बोऱ्हाडे वस्ती, मोशी, नवी सांगवी, रावेत, थेरगाव गावठाण, शिवाजीवाडी, मोशी, निगडी; सोमवारी (ता. २०) पूर्णानगर, चिंचवड, संत तुकारामनगर, पिंपरी, प्राधिकरण, निगडी, पिंपळे सौदागर, यमुनानगर, निगडी, रहाटणी, वाकड, थेरगाव गावठाण, चऱ्होली बुद्रूक, रहाटणी, मोरवाडी, भोसरी, पुनावळे, पिंपरी बाजार, रहाटणी, जाधववाडी, चिखली, प्रेमलोक पार्क, चिंचवड; तर मंगळवारी (ता. २२) पहाटे वाकडमधील शेडगे वस्ती येथे दुचाकीच्या सर्व्हिस सेंटरच्या पत्र्याच्या शेडला आग लागली. यामध्ये ३५-४० दुचाकी गाड्या व इतर साहित्य जळाले.
दिवाळीच्या कालावधीत आगीच्या बहुतांश घटना फटाक्यांमुळे घडतात. तरी नागरिकांनी फटाके फोडताना योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन अग्निशामक विभागाकडून करण्यात आले आहे.
----------