Nana Patekar on Madhuri Dixit : बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित हिला आज कोणत्या ओळखीची गरज नाही.. अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं… आज माधुरी पूर्वीप्रमाणे बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. माधुरी हिच्या आयुष्यातील एक काळ असा देखील होता, जेव्हा अभिनेत्रीचं नाव अभिनेते नाना पाटेकर यांच्यासोबत देखील जोडण्यात आलं.
सांगायचं झालं तर, माधुरीहिच्यावर असंख्य चाहते फिदा होते. पण यामध्ये दिग्गज अभिनेते नाना पाटेकर देखील होते. दोघांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम देखील केलं. एका टीव्ही शोमध्ये येताना, नाना पाटेकर यांनी माधुरीच्या प्रेमाबद्दल लिहिलेली एक शायरी आठवली. त्यांनी ती मोठ्याने म्हटली देखील.. त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
A post shared by Raj Raj Yogi (@megastarvibes)
नाना पाटेकर म्हणाले, ‘माझं माधुरीवर एकतर्फी प्रेम आहे… स्पष्ट आहे की, मी तिच्यासमोर माझ्या भावना व्यक्त करु शकत नाही… एकेकाळी माधुरीसाठी मी एक शायरी लिहिली होती.., ती आज बोलून दाखवतो…’, सध्या नाना पाटेकरांचा व्हिडीओ तुफान चर्चेत आहे.
नाना पाटेकर यांनी माधुरी दीक्षितसाठी केलेली शायरी…कैसे बताऊं मैं तुम्हें, तुम धड़कनों का गीत हो… जीवन का संगीत हो… तुम जिंदगी… तुम मंदगी… तुम रोशनी… तुम ताजगी… तुम हर खुशी….प्यार हो… प्रीत हो… मनमीत हो… आंखों में तुम… यादों में तुम… नींदों में तुम… ख्वाबों में तुम हो…तुम हो मेरी हर बात में… तुम हो मेरे दिन रात में… तुम सुबह में… तुम शाम में…, तुम सोच में…. तुम काम में…, मेरे लिए पाना भी तुम…, मेरे लिए खोना भी तुम…, मेरे लिए हंसना भी तुम…. मेरे लिए रोना भी तुम…और जागना- सोना भी तुम… जाऊं कहीं, देखूं कहीं… तुम हो वहां… तुम हो वहीं… कैसे बताऊं मैं तुम्हें… तुम बिन तो मैं कुछ भी नहीं…
माधुरी दीक्षित हिचं खासगी आयुष्यमाधुरी दीक्षित हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने मोठ्या पडद्यावर स्वतःचं नाव मोठं केलं. पण माधुरी खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत राहिली. बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करत असताना अभिनेत्रीचं नाव अभिनेता संजय दत्त याच्यासोबत देखील जोडण्यात आलं. पण त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. त्यानंतर अभिनेत्रीने डॉ. नेने यांच्यासोबत लग्न केलं. आज माधुरी तिच्या वैवाहिक आयुष्यात आनंदी आहे.