देशभरातील लाखो शेतकरी दिवाळीच्या आधीपासून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या २१ व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहात होते. परंतू अजूनही २१ वा हप्ता जमा झालेला नाही. त्यामुळे ही रक्कम शेतकऱ्यानी छठ पूजेच्या आधी जारी होऊ शकते असे म्हटले जात आहे. काही नैसर्गिक संकटे आलेल्या राज्यात २१ वा हप्ता आधीच जारी केलेला आहे. पीएम किसान योजना अल्पभूधारक आणि गरीब शेतकऱ्यांच्यासाठी केंद्र सरकारने आणलेली आहे. दर तीन महिन्यांनी शेतकऱ्यांना २ हजार रुपयांचा हप्ता या योजनेत मिळतो.
२१ वा हप्ता छठ पूजेपर्यंत येऊ शकतोकाही मीडिया रिपोर्ट्स नुसार २१ वा हप्ता येत्या छठपूजेपर्यंत येऊ शकतो. तर काही बातम्यांनुसार हा हप्ता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात येऊ शकतो. बिहार येथे निवडणूकांचे वातावरण पाहाता, हा २१ वा हप्ता आता नोव्हेंबरमध्येच मिळू शकतो असे म्हटले जात आहे.
हप्ता मिळण्यासाठी महत्वाची तीन कामे कराई-केवायसी तातडीने करा : जर तुम्ही अजूनपर्यंत ई-केवायसी केलेले नसेल तर लागलीच करुन घ्या. विना केवायसी तुम्हाला २१ वा हप्ता मिळणार नाही. तुम्ही नजिकच्या सीएससी सेंटरवर जाऊन वा अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in वर जाऊन ई-केवायसी करु शकता.
भू-सत्यापन करा : शेती योग्य जमिनीची पडताळणी करणे गरजेचे असते. जर तुम्ही भू-पडताळणी केलेली नाही. तर लागलीत जमीनीची पडताळणी करा, कारण लागवडी योग्य जमीनीची पडताळणी करणे अनिर्वाय आहे. त्याशिवाय तुम्हाला तुमचा हप्ता मिळणार नाही.
आधार लिंकिंग अनिवार्य: जर तुम्ही तुमच्या बँक खात्याशी तुमचे आधारकार्ड लिंक केले नसेल तर लागलीच करुन टाकावे,आधार लिंक नसल्याने देखील तुमचा २१ वा हप्ता रखडू शकतो.
काय आहे योजनादेशातील शेतकरी कुटुंबाना आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने ही पीएम किसान सन्मान योजना सुरु केलेली आहे. पीएम-किसान योजनेंतर्गत केंद्र सरकार डीबीटी अंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तीन समान हप्त्यात वार्षिक ६००० रुपये जमा करते. एका शेतकरी कुटुंबातील केवळ एकाच सदस्याला (पती किंवा पत्नी किंवा अल्पवयीन मुलं) या योजनेचा लाभ घेता येतो.